अहमदाबाद’ला कर्णावती हे नाव आहे. परंतु रीतसर ‘कर्णावती’ हे नाव सरकार दरबारी अधिकृत करण्यात आलेले नाही. अहमदाबादला तेथील जनता कर्णावती म्हणून ओळखते आणि या नावाला सुद्धा एक इतिहास आहे असे नमूद करतानाच, मग परकीय आक्रमण करणाऱ्यांची नावे बदलून आपली अस्मिता जोपासणारी नावे देण्यात हरकत काय आहे?, असा सवालही ही मागणी करताना शाह यांनी उपस्थित केला आहे.
महाराष्ट्रात शिवसेना भारतीय जनता पक्ष युतीचे सरकार म्हणजेच शिवशाही सरकार १९९५ साली अधिकारारुढ झाल्यानंतर औरंगाबाद चे संभाजीनगर आणि उस्मानाबाद चे धाराशिव करण्यात आले. परंतु काही नतद्रष्ट लोकांनी न्यायालयात धाव घेतली होती म्हणून ती नावे अंमलात येऊ शकली नाहीत. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या संपूर्ण गोष्टी माहित असूनही निव्वळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणि महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी हे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे आणण्यात येत आहेत, असेही ते पुढे म्हणाले.
सन २०१४ पासून नरेंद्र मोदी हे पंतप्रधान आहेत. मात्र ते औरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामांतर करु शकले नाहीत. तसेच ते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ‘भारतरत्न’ किताब देऊ शकले नाहीत. समान नागरी कायदा होण्याबाबत ‘अब समय आ गया है !’ असे देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे आवर्जून सांगतात परंतु तो समय अजूनही आलेला नाही, पर्यायाने ते होऊ शकलेले नाही, असे शाह म्हणाले.
क्लिक करा आणि वाचा-
आज देशात लाखो शेतकरी आपल्या न्याय्य हक्कांसाठी लढा देत असतांना, त्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न होतो आहे, अशी टीका शाह यांनी केली आहे. लोकांच्या भावनांशी खेळण्यापेक्षा त्यांच्या भावनांचा आदर करा आणि ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या केवळ घोषणा न राहता त्या अंमलात कशा येतील त्यासाठी प्रयत्न करा. औरंगाबाद, उस्मानाबाद या बरोबरच अहमदाबाद चे नामांतर करण्यात यावे, तशाच पद्धतीने मोगलांच्या, ब्रिटीशांच्या खुणा, आठवणी पुसून काढण्यात याव्यात, असे कळकळीचे आवाहनही शाह यांनी केले आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times