मुंबई: अभिनेत्री अनुष्का शर्मानं ११ जानेवारीला गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर काही दिवस ती सोशल मीडियापासून दूर होती. पण आता ती पुन्हा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे आणि विशेष म्हणजे मुलीच्या जन्मानंतर अनुष्कानं पहिल्यांदाच स्वतःचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण तिचा हा फोटो पाहिल्यावर तिचे चाहतेही हैराण झाले आहेत.

अनुष्कानं मुलीच्या जन्मानंतर आणि फॅमिली फोटो शेअर केले होते. मात्र तिनं पहिल्यांदाच स्वतःचा एकटीचा मिरर सेल्फी शेअर केला आहे. पण या फोटोमधील तिचा फिटनेस पाहून सर्वच अवाक् झाले आहे. या फोटोमध्ये अनुष्काच्या खांद्यावर बर्प क्लोथ आहे. जो लहान मुलांसाठी वापरला जातो. अनुष्कानं या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘माझी सध्याची फेवरीट एक्सेसरी- बर्प क्लोथ’ या फोटोमध्ये अनुष्काला पाहिल्यावर तिनं काही दिवसांपूर्वीच एका मुलीला जन्म दिला आहे असं अजिबात वाटत नाही.

अनुष्काचा प्रेग्नन्सीनंतरचा हा फिटनेस पासून तिचे चाहते हैराण झाले आहे. अनेकांनी तर, ‘तु काही महिन्यांपूर्वी प्रेग्नेन्ट होतीस होतीस असं अजिबात वाटत नाही.’ अशा आशयाच्या कमेंट केल्या आहेत. तर काहींनी विचारलं, ‘तू खरंच एका मुलीची आई आहेस का?’ असा प्रश्न विचारला आहे. प्रेग्नन्सी नंतर जवळपास सर्वच स्त्रियांचं वजन वाढतं, शरिराचा आकार बेढब होतो. मात्र अनुष्काच्या बाबतीत असं काहीच झालेलं नाही. प्रेग्नन्सीनंतरही ती पूर्वीसारखीच फिट आणि स्लिम दिसत आहे.

आणि विराट कोहलीनं त्यांच्या मुलीचं नाव वामिका असं ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी मुलीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. हा फोटो शेअर करताना त्यांनी सर्वांचे आभार मानले होते. त्यानंतर दिलेल्या एका मुलाखतीत विराटनं, ‘बाबा होण्याचा आनंद हा खूपच वेगळा आहे आणि या आनंदाची मी मॅच खेळण्यातल्या किंवा जिंकण्यातल्या आनंदाशी तुलना करू शकत नाही. हा माझ्या आयुष्यातला सर्वात मौल्यवान क्षण आहे.’ असं म्हटलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here