म.टा. वृत्तसेवा,

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आरोपी यांना जेलमध्ये व्हीआयपी ट्रीटमेंट आणि मोबाइल पुरवल्याप्रकरणी अलिबाग कारागृहाचे अधीक्षक अंबादास पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांची खातेनिहाय चौकशीनंतर कारवाई तुरुंग महानिरीक्षक यांनी केली. चौकशीमध्ये अर्णव यांना मोबाइल पुरवल्याचे स्पष्ट झाले. याअगोदर दोन तुरुंग कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती.

सही नोव्हेंबर रोजी अर्णव गोस्वामी यांना तुरुंगात मोबाइल पुरवला असल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने अर्णवसह दोघांना तळोजा कारागृहात हलवण्यात आले होते. अर्णवला मोबाइल पुरवण्याचा ठपका त्यावेळी तुरुंग पोलिस सुभेदार अनंत डेरे व सचिन वाडे यांच्यावर ठेवून करागृह अधीक्षक अंबादास पाटील यांनी त्यांना निलंबित केले होते. मात्र त्यानंतर या दोन्ही कर्मचाऱ्यांनी जिल्हा कारागृह अधीक्षक पाटील यांनीच मोबाइल आणि इतर सुविधा पुरवल्याचा आरोप केला होता.

वाचा: वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here