म. टा . प्रतिनिधी, मुंबई
विवा समूहाची ३४ कोटी ३६ लाख रुपयांची मालमत्ता अखेर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. वसई-विरारमध्ये दबदबा असलेले जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर; तसेच त्यांचे भाऊ आमदार यांची ही मालमत्ता आहे. पीएमसी बँक घोटाळ्यात ही कारवाई करण्यात आली आहे. (: ED Seizes Rs 34 Crores Property of Viva Group)

पीएमसी बँकेतून कर्ज घेऊन त्या रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी काही उद्योगसमूह ‘ईडी’च्या रडारवर आहेत. या अंतर्गत ‘ईडी’ने मागील महिन्यात ‘विवा समूहा’ची कार्यालये; तसेच ठाकूर बंधूंच्या घरांवर छापे टाकले होते. छाप्यादरम्यान हाती आलेल्या माहितीच्या आधारे ठाकूर यांची अंधेरीतील मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ‘ईडी’तील सूत्रांनुसार, अंधेरी पूर्वेकडील कॅलेडोनिया इमारतीतील मालमत्ता ‘मॅक स्टार’ या कंपनीने बांधली आहे. ‘मॅक स्टार’ ही हाउसिंग डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडची (एचडीआयएल) उपकंपनी आहे. ‘एचडीआयएल’ ही पीएमसी बँक घोटाळ्यातील सर्वांत मोठी कर्जबुडवी कंपनी आहे. एचडीआयएल, मॅक स्टार व विवा समूह यांचे संगनमत असल्याचे ‘ईडी’च्या तपासात समोर आले. त्यावरूनच अंधेरीतील कारवाई करण्यात आली.

‘एचडीआयएल’चे राकेश व सारंग वाधवान यांनी ‘मॅक स्टार’च्या अंधेरीतील मालमत्ता बेकायदा ‘विवा समूहा’कडे वळवल्या. त्यामध्ये दोन कार्यालयांचा समावेश असून त्यांची किंमत ३४ कोटी ३६ लाख रुपये इतकी आहे. यामुळेच त्या जप्त करण्यात आल्या आहेत. मुख्य म्हणजे, या दोन मालमत्तांची कागदोपत्री किंमत फक्त ३४ लाख ३६ हजार इतकीच दाखविण्यात आली आहे. त्यापोटी ‘विवा समूहा’ने ‘मॅक स्टार’ला ३७ चेक दिल्याचे तपासात आढळले आहे. राकेश वाधवान यांनी एचडीआयएल कंपनीमार्फत विवा समूहाचे संचालक मेहुल ठाकूर यांना मोठ्या प्रमाणात निधी वळवला. मुख्य म्हणजे, ‘एचडीआयएल’ने येस बँकेचे कर्जदेखील बुडवले आहे. या सर्व कर्जाऊ रक्कमेचा एचडीआयएल; तसेच विवा समूहाने गैरवापर केल्याचे दिसून येत असल्याचे ‘ईडी’चे म्हणणे आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here