अहमदनगर: ‘अयोध्येत उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरासाठी वर्गणीच्या नावाने भाजपचे पुढारी खंडणी गोळा करीत आहेत. वर्गणी द्या नाही तर तुम्ही देशद्रोही अशी वातावरण निर्मिती करणारे हे नवे खंडणीखोर तयार झाले आहेत,’ असा आरोप काँग्रेसचे श्रीरामपूरचे आमदार यांनी केला. त्यांच्या या आरोपाचे हिंदुत्ववादी संघटनांमध्ये पडसाद उमटले असून श्रीरामपूरमध्ये कानडे यांचा भाजप व मनसेच्या कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात आला. कानडे यांनी माफी मागावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.

वाचा:

राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी बोलताना कानडे यांनी हा आरोप केला. सध्या राम मंदिराच्या उभारणीसाठी वर्गणी संकलन वेगाने सुरू आहे. शहरी आणि ग्रामीण भागापर्यंत यासाठी स्वयंसेवकांची यंत्रणा राबत आहे. उद्योजकांपासून सामान्य नागरिकांपर्यंत सर्वस्तरांतून वर्गणी संकलन सुरू आहे. अशा परिस्थितीत कानडे यांनी हा आरोप केला आहे.
कानडे म्हणाले, ‘भाजपच्या पुढाऱ्यांकडून तुम्ही रामभक्त आहात का अशी विचारणा केली जाते. आमच्या रामभक्तीवर संशय घेणारे हे कोण? ग्रामीण भागात एकमेकांना भेटल्यावर नमस्कार करताना रामराम म्हणण्याची पद्धत आहे. आता हे लोक रामरामऐवजी जय श्रीराम म्हणायला सांगत आहेत. राम मंदिरासाठी दिल्या जाणाऱ्या वर्गणीचा संबंध देशभक्तीशी जोडला जात असून वर्गणी दिली तर देशभक्त आणि नाही दिली तर देशद्रोही असल्याचे ठरविले जात आहे. भाजपचे पुढारी वर्गणीच्या नावाखाली अशा पद्धतीने खंडणीच जमा करीत आहेत. भावनात्मक लाटा तयार करुन सत्ता काबीज करण्याचा यांचा डाव आता जनतेच्या लक्षात आला आहे,’ असा आरोप कानडे यांनी केला.

माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरही त्यांचे नाव न घेता कानडे यांनी टीका केली. ते म्हणाले, ‘काँग्रेसमध्ये त्यांना मानसन्मान होता. पक्ष सत्तेत असताना भरपेट खाऊन नंतर भरधाव धावणाऱ्या भगव्या अश्वाला पाहुन तेही तिकडे पळाले. मात्र, त्यांना भगव्या वातावरणात किती मान सन्मान मिळतो हे जनता पाहत आहेच.’

वाचा:

दरम्यान, कानडे यांच्या वक्तव्याचा हिंदुत्ववादी संघटनांकडून निषेध करण्यात आला. श्रीरामपूरमधील श्रीराम मंदीर चौकात मनसे व भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत कानडे यांचा निषेध केला. कानडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांना यासंबंधीचे निवेदन देण्यात आले. प्रकाश चित्ते, संजय यादव, बाबा सोनवणे, राजेंद्र सोनवणे, कुणाल करंडे यावेळी उपस्थित होते.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here