अमित शहा यांनी काल शिवसेनेवर सडकून टीका केली होती. या टीकेला उत्तर देताना संजय राऊत यांनीही काल सावध भूमिका घेत एक ट्विट केलं होतं. ‘सन १९७५ मध्ये रजनी पटेल यांनी आणि ९० च्या दशकात मुरली देवरा यांनी शिवसेना संपेल असे भाकीत केले होते. पुन्हा सन २०१२ मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील असेच म्हटले होते आणि दोन्ही वेळेस शिवसेना अधिक ताकदीने पुढे आली, असं राऊतांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज त्यांनी पुन्हा एक ट्वीट केलं आहे.
वाचाः
संजय राऊत हे अधूनमधून आपल्या ट्विटर अकाउंटवर विविध प्रकरणांवर सूचक भाष्य करणारे शेर किंवा कवितेच्या ओळी टाकत असतात. त्यामुळं या प्रकरणावर ते काय ट्वीट करतात याकडं लक्ष लागलं होतं. आज संजय राऊत यांनी एक शेर ट्वीट केला आहे.
‘तुफान ज्यादा हो तो
कश्तियां डूब जाती है
और घमंड ज्यादा हो तो
हस्तियाँ डूब जाती है’
असं त्यांनी म्हटलं आहे. या शायरीच्या नंतर जय हिंद, जय महाराष्ट्र असंही लिहिलं आहे. शायरीतून त्यांनी नेमका कोणाला टोला हाणला आहे तसंच, या शायरीचा नेमका उद्देश काय, याची चर्चा आता सुरु झाली आहे.
वाचाः
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times