वाचा:
‘लोकल ट्रेनसह मुंबईतील सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत होणे हे रुग्णांच्या संख्येवर अवलंबून आहे. आता सर्वांसाठी लोकल खुली होऊन आठवडा उलटल्यानंतरही करोना रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली नाही. पुढील १५ दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास लोकल ट्रेनच्या सध्याच्या वेळापत्रकात बदल केले जातील आणि मुंबईकरांना दिलास मिळेल,’ असं काकाणी यांनी सांगितलं.
मुंबईतील नायर रुग्णालयात काकाणी यांनी करोनाची लस टोचून घेतली. त्यानंतर ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही दिलासादायक माहिती दिली.
वाचा:
सध्या मुंबईतील लोकल ट्रेन सकाळी पहिल्या गाडीपासून सात वाजेपर्यंत, दुपारी १२ ते ४ या वेळेत आणि रात्री ९ नंतर सर्वांसाठी खुली आहे. त्यामुळं काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी कार्यालयांच्या वेळा बदलल्या गेल्या नसल्यानं मुंबईचे जनजीवन अद्यापही ट्रॅकवर आलेले नाही. कुठल्याही कामासाठी बाहेर पडताना सर्वसामान्यांना ट्रेनचे वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं लागत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काकाणी यांनी दिलेली माहिती महत्त्वाची मानली जात आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times