याबाबत शंतनू अशोक वावरे (वय २८, रा. धानोरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मैत्रिणीच्या पतीला अटक केली आहे. तर, त्याचे साथीदार सनी (रा. विश्रांतवाडी) आणि इशान (वय ३३) यांचा शोध घेण्यात येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शंतनू व आरोपीची पत्नी हे दोघे मित्र आहेत. शनिवारी रात्री साडेआठच्या सुमारास शंतून हा त्याच्या मैत्रिणीसोबत घरी जात होता. त्यावेळी तिचा पती आणि मित्र तेथे आले. त्यांनी शंतनूला थांबवले. माझ्या बायकोसोबत का फिरतोस, अशी विचारणा आरोपीने केली. त्यानंतर शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपीसोबत असलेल्या दोघांनी शंतनूला पकडून ठेवले. आरोपीने त्याला पट्ट्याने त्याला जबर मारहाण करून जखमी केले. त्यानंतर आरोपी निघून गेले. या प्रकरणी शंतनू याने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून, पतीला अटक केली आहे. तर, इतर दोघांचा शोध सुरू आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times