मुंबईः शेतकरी आंदोलनाबाबत कलाकारांनी केलेल्या ट्विटची चौकशी करणार असल्याची भूमिका राज्याचे गृहमंत्री यांनी घेतली आहे. गृहमंत्र्यांच्या या निर्णयावर भाजपनं सडकून टीका केली आहे.

आज काँग्रेस शिष्टमंडळाची झूम मिटिंगद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठक पार पाडली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या कलाकारांवर कोणाचा दबाव आहे का याची चौकशी करु असं म्हटलं आहे. गृहमंत्र्यांच्या या निर्णयावर भाजप नेते यांनी टीका केली आहे.

‘राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांनी देशहितासाठी केलेल्या ट्विटची चौकशी करणार असल्याचं विधान केलं आहे. यावर मला एक प्रश्न पडलाय करोना अनिल देशमुखांना झालाय की त्यांच्या मेंदुला,’ असं धक्कादायक विधान अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

वाचाः

‘राजकारणासाठी अशा प्रकारची विधानं हे राज्य सरकार करत आहेत. येणाऱ्या काळात राज्याची जनता भारतातील प्रतिभावन व्यक्तींच्या विरोधात असं वक्तव्य करणाऱ्या सरकारला धडा शिकवेल,’ असंही भातखळकर यांनी म्हटलं आहे.

‘तुमच्या पक्षाचे नेते पद्म विभूषण आहेत, परंतु ज्यांच्याकडे तुमचा इशारा आहे ते भारतरत्न आहेत. तुम्हाला न ओळखणारे नागपुरातही सापडतील,’ अशी खोचक टीकाही त्यांनी केली आहे.

वाचाः

दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांची शुक्रवारी करोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज देशमुख यांनी रुग्णालयातूनच काँग्रेसचे बैठकीत हजेरी लावली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here