नागपूरः नागपूरजवळील वाडी परिसरात भारतीय जनता युवा मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यांवरुन भाजयुमोनं आक्रमक पवित्रा घेतला असून यावेळी थेट उपमुख्यमंत्र्यांनाच घेरलं आहे.

राज्यात लॉकडाऊनच्या काळात जनतेला वाढीव वीज बील आले आहेत. वीज बिलातून ग्राहकांना सूट द्यावी या मागणीसाठी भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे. शुक्रवारी भाजपनं वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर सरकारविरोधात आंदोलनही केलं होतं. त्यानंतर आज भाजयुमोनं थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गाडी अडवली आहे. यावेळी, चार जणांना अटक करण्यात आलयाची माहिती समोर येत आहे.

वाचाः

वाढीव वीज बिल माफीची मागणी करणारे निवेदन देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते जमले होते. मात्र, अजित पवार गाडी न थांबवता निघून जात होते. तसंच, आमचं निवेदनही त्यांनी स्विकारलं नाही. म्हणून त्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला, असं भाजयुमोनं म्हटलं आहे. यावेळी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पवारांच्यया गाडीची ताफा अडवल्यानंतर सरकारविरोधी घोषणाही दिल्या.

वाचाः

भाजपचा बहिष्कार

उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयातील जिल्हा वार्षिक योजनेच्या बैठकीवर भाजप आमदारांनी बहिष्कार टाकला. जिल्हा वार्षिक योजनेत वाढ करावी, अखर्चित निधीला मुदतवाढ द्या, आदी मागण्यांसाठी सदस्यांनी सरकारविरोधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला. दरम्यान, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार यांनी मध्यस्थी करून सर्व सदस्यांना चर्चेसाठी आमंत्रित केले होते.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here