म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: पेन्शन बंद करण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजपला याच पेन्शनधारकांचा शाप लागला, ज्यामुळे जिल्ह्यात त्यांचा एकही आमदार निवडून आला नाही असा टोला ग्रामविकास मंत्री यांनी लगावला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष यांना मारलेल्या या टोल्यामुळे या दोन नेत्यांत पुन्हा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे आहेत.

संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांची पेन्शन एक हजार रुपयांवरून दोन हजार रुपये केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. कागलमध्ये योजनेच्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्राच्या वाटप कार्यक्रमात मंत्री मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तेव्हा ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने होते.

भाषणात मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, समाजात म्हाताऱ्या आई-वडिलांकडे न बघण्याची अपप्रवृत्ती वाढीस लागली आहे. अशा परिस्थितीत वृद्धापकाळात औषधपाणी व घर खर्चासाठी म्हणून या पेन्शनचा आधार मिळत आहे. माजी मंत्री चंद्रकांत पाटलांनी हे मतदान हसन मुश्रीफांना मिळतंय म्हणून बंद केलेल्या पेन्शनधारकांचा शापच भाजपवाल्यांना लागला. त्यामुळेच; जिल्ह्यात एकही भाजपचा आमदार झाला नाही. भाजपच्या पाच वर्षाच्या राजवटीत राजकीय द्वेषातून बंद केलेल्या पेन्शन धारकांच्या पेंशन पुन्हा पूर्ववत सुरू करु, असंही हसन मुश्रीफ म्हणाले आहेत.

वाचाः

वीरेंद्रसिंह मंडलिक म्हणाले, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी ही मुश्रीफ साहेबांची व्होट बँक आहे. त्यांनी केलेल्या या प्रचंड सेवाभावी कामाचाच त्रास आम्हाला २००९ च्या विधानसभा निवडणुकीत झाला. प्रास्ताविकपर भाषणात समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले, भाजपच्या कारकिर्दीत चार हजाराहून अधिक लोकांच्या पेन्शन बंद केल्या. त्यापैकी बाराशे लोक औषध -पाण्यावाचून तडफडून मेले. ते थांबलेले सेवाकार्य महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुन्हा नव्या जोमाने सुरू राहील.

वाचाः

तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना सरळ करा

मुश्रीफ म्हणाले, या योजनेच्या लाभासाठी २१ हजारची उत्पन्न मर्यादा वाढवून ती ५० हजार रुपये करण्यासाठी प्रयत्न करू. अधिकाऱ्यांनी या लाभार्थ्यांच्या कामाकडे सहानुभूतीने बघण्याची गरज असल्याचे सांगतानाच तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे यांना मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट शब्दात सूचना दिल्या की, या लाभार्थ्यांचे काम करताना करणाऱ्या तलाठी व मंडल अधिकाऱ्यांना आधी सरळ करा.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here