आरोग्य विभागाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार आज १५ करोना बाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. गेल्या काही महिन्यांतील हा नीचांकी आकडा ठरला आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.५१ टक्के इतका आहे. राज्यात करोनाने आतापर्यंत ५१ हजार ३२५ रुग्ण दगावले आहेत.
आज राज्यात २ हजार २१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्याचवेळी ३ हजार ४२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. नवीन बाधितांच्या तुलनेत हा आकडा जास्त असल्याने आज काहीसा दिलासा मिळाला आहे. राज्यात आजपर्यंत एकूण १९ लाख ५८ हजार ९७१ करोना बाधित रुग्ण करोनामुक्त झाले असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.७३ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १ कोटी ५० लाख १० हजार ०३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २० लाख ४६ हजार २८७ ( १३.६३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १ लाख ६७ हजार ७६४ व्यक्ती होमक्वारंटाइनमध्ये आहेत तर १ हजार ९७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
क्लिक करा आणि वाचा-
राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात
राज्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या सध्या ३४ हजार ७२० इतकी आहे. मुंबईत ही संख्या ५ हजार ३३८ इतकी आहे. तर, ठाण्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ हजार ४५९ इतकी सर्वाधिक आहे. पुण्यात ५ हजार ८२४,नाशिकला १०००, औरंगाबादला ६६६, नागपूर ३ हजार ५२१ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात सर्वात कमी अॅक्टिव्ह रुग्ण गडचिरोलीत आहेत. तेथे ही संख्या ५६ इतकी आहे.
क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times