अमरावती: भरून निघावा यासाठी केलेल्या निधीच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री (Ajit Pawar) आणि राज्यमंत्री (Bachchu Kadu) यांच्यात शाब्दिक वाद झाला. अमरावती विभागातील वार्षिक नियोजनाच्या बैठकीदरम्यान बच्चू कडू यांनी वाढीव निधीची मागणी केल्याने हा वाद झाला. (verbal dispute between deputy chief minister and minister of state )

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात अमरावती विभागाच्या वार्षिक नियोजनाची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत लोकप्रतिनिधींच्या मागणीनुसार अमरावती जिल्ह्यायासाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यासाठी ३२५ कोटी रुपये, बुलढाणा जिल्ह्यासाठी २९५ कोटी रुपये, वाशिम जिल्ह्यासाठी १८५ कोटी रुपये, तर अकोला जिल्ह्यासाठी १८५ कोटीचा रुपयांचा निधी देण्यात आला. असे असले तरी देखील या निधीबाबत अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आपण सरकारचा एक भाग असल्याने काही बालू शकणार नाही. मात्र, विदर्भाचा अनुशेष भरून निघावा यासाठीच आपण अधिक निधीची मागणी केली होती. ही मागणी असताना निधी मात्र वाढवून देण्यात आला नाही, असे बच्चू कडू म्हणाले. असे असले तरी देखील निधी वाढवण्यासाठी आम्ही नक्कीच प्रयत्न करत राहू असे बच्चू कडू यांनी सांगितले.

तरतुदीपेक्षा वाढील निधी दिला- अजित पवार
अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांना तरतुदीपेक्षा वाढीव निधी देण्यात आला असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अकोला जिल्ह्यासाठी १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ती तरतूद १६५ वरून १८५ कोटी रुपये करण्यात आली आहे. याशिवाय अमरावतीसाठी २८५ कोटी रुपये इतकी तरतूद होती. त्यात वाढ करून की ३०० कोटी रुपये करण्यात आली. यवतमाळसाठी ३१० कोटी रुपयांची असलेली तरतूद वाढवून ती ३२५ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे.

क्लिक करा आणि वाचा-
बुलढाणा जिल्ह्यासाठी २८५ कोटी रुपयांची तरतूद होती. यात वाढ करून ती २९५ कोटी रुपये, तर वाशिम जिल्ह्यासाठी असलेली १४० कोटी रुपयांची तरतूद वाढवून ती १८५ कोटी रुपये इतकी करण्यात आली आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. वाशिम जिल्हा हा मागास जिल्ह्यात मोडत असल्याने या जिल्ह्याला वाढीव निधी देण्यात आला असल्याचेही पवार म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here