म.टा. प्रतिनिधी, नागपूर

मृत्यू झालेल्या बहुतांश करोनारुग्णांना अगदी शेवटच्या क्षणी, रात्री-अपरात्री मेडिकल, मेयोमध्ये रेफर करणाऱ्या खासगी रुग्णालयांना नोटीस देत कारवाई करा, अशा शब्दांमध्ये केंद्रीय आरोग्य पथकाने (central health squad) नाराजी व्यक्त केली. खासगी रुग्णांलयाच्या अशा भूमिकेमुळे सरकारी रुग्णालयातील करोनांचा मृत्यूदर () वाढल्याचा अंदाज याप्रसंगी वर्तविण्यात आला. (the has directed to take action against )

राज्यात करोनाचा मृत्यूदर २.५२ टक्के असताना नागपूर जिल्ह्याचा मृत्यूदर ३.०८ टक्क्यांवर गेला आहे. दिवसाकाठी २५० ते ३५० नवीन बाधित आढळताहेत. या पार्श्वभूमीवर इंटिग्रेटेड डिसीज सर्व्हिलन्स कार्यक्रमाचे संचालक डॉ. सुजित कुमार सिंग यांच्या नेतृत्वातील केंद्रीय आरोग्य विभागाच्या पथकाने मृत्यूदर कमी करण्यासंदर्भात केलेल्या उपाययोजना जाणून घेतल्या. या पथकामध्ये उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी आणि डॉ. रणजित कौशिक यांचादेखील समावेश आहे. उपसंचालक आरोग्य विभागाच्या कार्यालयात दिवसभर त्यांनी संपूर्ण आकडेवारी जाणून घेतली.

या प्रसंगी जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातुरकर, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, डॉ. धकाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.दीपक सेलोकर, डॉ. नितीन गुल्हाने, मेडिकलचे प्रभारी अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंग, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. राजेश गोस्वामी, डॉ. वासुदेव बारसागडे, डॉ. जयेश मुखी, डॉ. मुरारी सिंग यांच्यासह मेयोचे डॉ. दिलीप जाधव, डॉ. प्रशांत बागडे यांच्यासह इतरही संस्थांचे अधिकारी उपस्थित होते. नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील करोनाची स्थिती जाणून घेण्यावर पथकाचा भर होता. तत्पूर्वी, रविवारी या पथकाने अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थितीची माहिती घेतली. सर्व जिल्ह्यातील प्राप्त आकडेवारी आणि उपाययोजनांच्या आधारावर विविध शिफारशींसह एक सविस्तर अहवाल केंद्राच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाला सुपूर्द करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांची सूचना

करोना स्थितीसंदर्भात केंद्रीय पथकाने विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि भंडारा या चार जिल्ह्यांबाबत नोंदविलेल्या निरीक्षणासंदर्भात नागपूर आणि अमरावती विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला अधिक सतर्क राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. तसेच ज्या भागातील पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे तेथील रुग्णांची जिनॉमिक सिक्वेन्सची तपासणी करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

क्लिक करा आणि वाचा-

विदर्भात पॉझिटिव्हिटी दर अधिक

देशात असलेल्या एकूण सक्रिय करोना रुग्णसंख्येपैकी केरळमध्ये ४० टक्के तर महाराष्ट्रात २४ टक्के रुग्ण आहेत. त्याबाबत आढावा घेण्यासाठी आलेल्या पथकाने मुंबईतील सायन हॉस्पिटल तसेच अमरावती, अकोला, यवतमाळ, नागपूर येथे भेट दिली. राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्येपैकी मुंबई, ठाणे, पालघर भागात जास्त रुग्णसंख्या असून या भागातील नविन रुग्णांची संख्या घटत असल्याचे पथकाने सांगितले. विदर्भातील ग्रामीण भागात विशेषत: अमरावती, अकोला, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर जास्त आढळून येत असल्याचे निरीक्षण पथकाने नोंदविले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here