नवी दिल्ली: करोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एन-९५ मास्कची परदेशातून अचानक मागणी वाढली आहे. त्यामुळे या मास्कची मोठ्या प्रमाणावर निर्यात करण्यात आल्याने देशात या मास्कचा तुटवडा निर्माण आहे. त्यामुळे अखेर केंद्र सरकारने एन-९५ मास्कच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

करोनापासून बचाव करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. त्यामुळे चीनसह इतर देशांमधून या मास्कची प्रचंड मागणी वाढली होती. सुरुवातीला भारतानेही या मास्कची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली. मात्र भारतातही करोनाचा धोका निर्माण झाल्याने भविष्यात अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून केंद्र सरकारने या मास्कची निर्यात करणं थांबवलं असून मास्कच्या निर्यातीवर बंदी घातली आहे.

विदेश व्यापार महानिदेशालयाने एक अधिसूचना काढून ही बंदी घातली आहे. कपडे आणि मास्कसहीत हवेद्वारे येणाऱ्या कणांपासून बचाव करणाऱ्या प्रत्येक वस्तूंच्या निर्यातीवर पुढील आदेशपर्यंत बंदी घालण्यात येत आहे. त्यात एन-९५ मास्कचाही समावेश आहे, असं या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.

दरम्यान, करोना व्हायरसने आतापर्यंत दोनशेहून अधिक लोकांचा बळी घेतल्याने चीनमध्ये या व्हायरसची प्रचंड दहशत निर्माण झाली आहे. तर दहा हजार लोकांना या रोगाचा संसर्ग झाला आहे. या पार्श्वभूमीवर करोना विषाणूग्रस्त वुहानमधील भारतीयांना परत आणण्यासाठी सरकारी एअर इंडियाचे विशेष जम्बो जेट विमान आज सकाळी मुंबईहून दिल्लीमार्गे वुहानला रवाना झाले असून उद्यापासून चीनमधून भारतीयांची भारतात येण्यास सुरुवात होणार आहे.

करोना होण्याची कारणं

हा संसर्गामुळे होतो. त्यामुळेच या रोगाची लागण झपाट्याने होत असल्याचं वैद्यकिय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हवा आणि श्वासोच्छवासाद्वारे करोना व्हायरसची एका व्यक्तिपासून दुसऱ्या व्यक्तिला लागण होते. लोक अर्ध कच्चं मांस खात असल्यानेही हा व्हायरस फैलावत असल्याचं या तज्ज्ञांचं म्हणणं आहे. सी-फूड सुद्धा व्हायरस पसरण्याचं कारण होऊ शकतं, असंही म्हटलं जात आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here