काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आणि यांनी नितीन गडकरी यांच्या निवडीला आव्हान दिले आहे. नितीन गडकरी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे प्रतिज्ञापत्र भरताना आपल्या उत्पन्नाविषयी खोटी माहिती दिली. तसेच त्यांचे नाव नितीन जयराम गडकरी की नितीन जयराम बापू गडकरी असे आहे, हे स्पष्ट नाही असे याचिकर्त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलेले आहे.
त्याच प्रमाणे निवडणुकीत अनेक मतदान केंद्रावर अतिरिक्त मतदान झाले असतानाही केंद्रप्रमुखांनी मतदान प्रक्रिया सुरू ठेवली, असेही याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. मतदारांच्या नोंदणीतही मोठा घोळ होता. या सर्व बाबी विचारात घेता गडकरी यांनी चुकीच्या माहितीद्वारे मतदारांची फसवणूक केली असून त्यांची निवड अवैध ठरवण्यात यावी, अशी विनंती याचिकाकर्त्यांनी केली. याचिकाकर्त्यांची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.
क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times