महाराष्ट्र सरकारने दिले चौकशीचे आदेश
सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर विराट कोहली आणि बॉलिवूडमधील दिग्गज कलाकारांनी केलेल्या ट्विटची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. केंद्रातील मोदी सरकारच्या दबावाखाली या सेलिब्रिटींनी हे ट्विट केली नाहीत ना? याची चौकशी करायची आहे, महाराष्ट्रातील महाविकस आघाडी सरकार करणार आहे.
कॉंग्रेसच्या तक्रारीनंतर कारवाई
काँग्रेसच्या तक्रारीनंतर महाराष्ट्र सरकारने ही कारवाई सुरू केली आहे. काँग्रेसच्या शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची ऑनलाइन भेट घेतली. पॉप सिंगर रिहानाच्या ट्विटनंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, विराट कोहली यांच्यासह बॉलिवूडमधील अनेक बड्या कलाकारांनी ट्विट केले. यात अनेक शब्द हे समान होते. यामुळे हे सर्व ट्विट कुठल्या दबावाखाली केली गेले आहेत का? हे तपासणे फार महत्वाचे आहे, असं महाराष्ट्र सरकारने म्हटलं आहे.
‘देशातील एकता दर्शविणारे ट्वीट’
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या चौकशीच्या आदेशावरून भाजप नेते आणि प्रवक्ते राम कदम यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, सुनील शेट्टी आणि अक्षय कुमार या सर्वांनी विदेशी नागरिकांच्या कटाविरोधात ट्विट केलं होतं. यात भारताची एकजूट आणि आम्ही सर्व एक आहोत, असा संदेश दिला गेला. मग महाराष्ट्र सरकार या ट्वीटला देशविरोधी कसे म्हणते? महाराष्ट्र सरकार या वयात लतादीदींच्या ट्वीटची चौकशी करेल, असेही ते म्हणाले. ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. देशाविरूद्ध असलेल्या शक्तींचा प्रवक्ता म्हणून कॉंग्रेस पक्ष कार्यरत आहे, अशी टीकाही कदम यांनी केली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times