नंदुरबार: गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात पक्ष्यांचा मृत्यू होत आहे. यातील काही पक्ष्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने (Bird Flu) झाल्याचे उघड झाले आहे. हे पाहता राज्यात सावधगिरी बाळगण्यात येत असून बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्या मारल्या जात आहेत. आज नंदुरबारमध्ये दिवसभरात ८८ हजार कोंबड्या मारण्यात आल्या आहेत. नंदुरबारमधील ५ पोल्ट्री फार्मवर हे किलिंग ऑपरेशन राबवण्यात आले. (as many as 88 thousand chickens culled in )

नंदुरबारमधील एकूण ५ पोल्ट्री फॉर्मवर किलिंग ऑपरेशन राबवण्यात आले असून त्याअंतर्गत आज दिवसभरात ८८ हजार ३७३ कोंबड्या मारण्यात आल्या. या किलिंग ऑपरेशनसाठी तब्बल ८२ पथकांनी काम केले. या ८२ पथकांमध्ये साडे चारशेहून अधिक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान, गेल्या दोन दिवसात एकूण १ लाख ३० हजार ७४७ पक्ष्यांना मारण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार

बर्ड फ्लू या आजाराचा प्रतिबंध करण्यासाठी प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 अधिनियामान्वये राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार शासन अधिसूचना 12 जानेवारी 2021 नुसार संबंधित जिल्हाधिकारी यांना प्रदान केले आहेत. बर्ड फ्लूमुळे पक्षी दगावलेल्या संवेदनशील भागास सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित केले जाण्याची प्रक्रिया करण्यात येत आहे. तसेच आवश्यक त्या दक्षता घेतल्या जात असून स्थानिक प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाय योजनाही करण्यात येत आहेत.

क्लिक करा आणि वाचा-

पक्षी पाळणाऱ्यांनी ‘हे’ नियम पाळणे आवश्यक

कुक्कुट पालन करणाऱ्यांनी किंवा पक्षी पाळणाऱ्यांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना करण्यात आली आहे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज घालणे आवश्यक आहे. तसेच, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क वापरणेही आवश्यक आहे. दुकानात नियमित स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. सामाजिक अंतराचे देखील पालन करणे तितकेच आवश्यत आहे. थोडक्यात काय, तर बर्ड फ्लूचा अटकाव करण्यासाठी निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here