मुंबई: ‘मी पुन्हा येणार’ असे सातत्याने म्हणणाऱ्या यांचे स्वप्न पूर्ण व्हायला अजून २५ वर्ष लागतील, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री यांनी लगावला आहे. मलिक यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री व भाजपचे राज्यसभा सदस्य यांच्यावरही निशाणा साधला. ( Updates )

वाचा:
भाजप नेत्यांकडून सातत्याने राज्यात सत्तांतर होणार, असे दावे केले जातात. त्यात विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिरा भाईंदर येथे बोलताना महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसचे संकेत दिले. आम्हीच फासे पलटवणार. कोणतीही शिडी न वापरता आम्ही हे करून दाखवू. हे फासे मोठे असतील, अशाप्रकारचं विधान फडणवीस यांनी केलं होतं. त्यापाठोपाठ नारायण राणे यांनीही याबाबत महत्त्वाचे विधान केले होते. केंद्रीय गृहमंत्री यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणे बोलले होते. अमित शहा यांच्या पायगुणाने राज्यातलं सरकार जाऊ दे आणि राज्याला नवं चांगलं सरकार मिळू दे, अशी इच्छा राणे यांनी प्रदर्शित केली होती. प्रत्यक्षात शहा यांनी आपल्या भाषणात ठाकरे सरकारचा तीन चाकांची रिक्षा असा उल्लेख करून मुख्यमंत्री यांच्यावर टीका केली पण ऑपरेशन लोटसबाबत काहीच भाष्य केलं नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं असताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी फडणवीस व राणेंची खिल्ली उडवली.

वाचा:

आम्ही फासे फिरवणार आहोत, असे भाजप नेते सांगत असले तरी ते कुठले फासे फिरवणार आहेत, हे आम्हाला माहीत नाही, असाही उपरोधिक टोला नवाब मलिक यांनी लगावला. गेली २२ वर्षे नारायण राणे मुख्यमंत्री बनण्याची स्वप्न बघत आहेत. परंतु, त्यांना फासे काही फिरवता आले नाहीत आणि मुख्यमंत्रीही होता आले नाही. आता त्यांच्या जोडीला देवेंद्र फडणवीस आले आहेत. त्यांनाही मुख्यमंत्रिपदाची स्वप्ने पडत आहेत. स्वप्न पाहणे हा त्यांचा अधिकार आहे पण फडणवीसांचे ‘मी पुन्हा येणार’ हे स्वप्न काही पुढची किमान २५ वर्षे पूर्ण होऊ शकणार नाही, असे मलिक म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकार बनवताना सांगितले होते की, आमचे सरकार पाच वर्षे नाही तर २५ वर्ष टिकणार आहे आणि प्रत्यक्षात तेच घडणार आहे, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here