नवी दिल्लीः लोकसभेचे कामकाज ( ls resumes discussion ) सोमवारी मध्यरात्रीपर्यंत चालले. यासह नवीन कृषी कायद्यांच्या ( farm laws ) मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आठवड्याभरातील तिढाही सूटला. संरक्षणमंत्री ( ) यांनी केलेल्या आवाहनाने हे सर्व घडले. लोकशाहीची परंपरा शाबूत ठेवा आणि चर्चेत सहभागी व्हा, असं आवाहन राजनाथ यांनी विरोधकांना केलं. यानंतर विरोधक चर्चेत सहभागी झाले.

लोकशाहीची परंपरा शाबूत ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे. स्वस्थ लोकशाहीसाठी चर्चेची परंपरा तोडू नका, अशी हात जोडून विनंती करत राजनाथ सिंह विरोधकांना चर्चेत सहभागी होण्याचं आवाहन केलं.

गदारोळामुळे सकाळी १० मिनिटंच चालले सभागृह

यापूर्वी विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज फक्त १० मिनिटेच चाललं आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कामकाज तहकूब करण्यात आलं. संध्याकाळी ५ वाजता कामकाज सुरू होताच लोकसभेचे सभागृहनेते राजनाथ सिंह यांनी एक निवेदन दिले. राज्यसभेने राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा केली आहे आणि लोकसभेनेही ती केली पाहिजे. लोकसभेची कारवाई मध्यरात्रापर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे सर्व खासदारांना आपलं म्हणणं मांडता येईल, असं राजनाथ सिंह म्हणाले.

शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्नः काँग्रेस

लोकसभेतील चर्चेत सहभागी होत कॉंग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी शेतकरी आंदोलनावरून सरकारवर निशाणा साधला. सरकार शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप चौधरी यांनी केला. तसंच शेतकऱ्यांच्या आंदोलनावर सेलिब्रिटींच्या सोशल मीडिया पोस्टवरही ते बोलले. लता मंगेशकर आणि सचिन तेंडुलकर यासारख्या सेलिब्रिटींची या प्रकरणी दिशाभूल केली गेली आहे, असंही चौधरी म्हणाले.

आपला देश इतका कमकुवत आहे की शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या १८ वर्षांच्या ग्रेटा थनबर्गला देशाची शत्रू ठरवलं जात आहे?, असा सवाल चौधरी यांनी केला. देशाचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरुंनी स्ववलंभी भारतासाठी दिलेल्या योगदानाबद्दल भाजप नेते चकार शब्दही काढत नाही. यातूनच त्यांची संकुचित दृष्टी स्पष्ट होते, अशी टीका त्यांनी केली.

दिल्लीच्या सीमांवर हजारो करत असताना आम्ही गप्प बसणार नाही. या आंदोलनात आतापर्यंत २०६ हून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत येण्यापासून शेतकऱ्यांना आडण्यासाठी रस्त्यांमध्ये खिळे ठोकले जात आहेत. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी, अशी आमची मागणी आहे, असं अधीर रंजन चौधरी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here