नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी ( ) यांनी सोमवारी रात्री अकराच्या सुमारास अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन ( ) यांच्याशी फोनवर चर्चा केली. त्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली. जो बिडेन यांनी २० जानेवारीला अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यानंतर १९ दिवसानंतर प्रथमच दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

जो बिडेन यांना आपण विजयाच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही स्थानिक मुद्दे आणि प्राधान्याने दोन्ही देशातील सामायिक विषयांवर बोललो. हवामान बदलांच्या विरोधात सहकार्याचा पाठपुरावा करण्यास देखील आम्ही सहमत झालो. आम्ही इंडो-पॅसिफिक प्रदेश आणि त्यापलीकडे शांतता आणि सुरक्षिततेसाठी धोरणात्मक भागीदारी बळकट करण्यास तत्पर आहोत, असं पंतप्रधान मोदींनी सांगितलं.

पंतप्रधान मोदींनी ३ महिन्यांपूर्वी आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी चर्चा केली होती. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये भारत-अमेरिकेतील सामरीक भागीदारी, करोना व्हायरसची साथ, हवामान बदल आणि भारत प्रशांत महासागर क्षेत्रातील सहकार्यासारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली.

बायडेन पहिल्या आठवड्यात केवळ ७ देशांच्या प्रमुखांशी बोलले

जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेसाठी परराष्ट्र धोरण अतिशय महत्वाचं आहे. यानुसार पहिल्या आठवड्यात बायडन यांनी केवळ ७ देशांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केली. यामध्ये अमेरिकेचा सर्वात जवळचा मित्र ना इस्रायल होता ना आशियातील दोन्ही शक्ती म्हणजेच भारत आणि चीन होते. तर यामध्ये सौदी अरेबिया, युएई आणि बहरीनसारख्या कोणत्याही आखाती देशांचा समावेश नव्हता. बायडन यांनी पहिला फोन कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांना केला होता.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here