पुणे: पुण्यासह राज्यातील २१ जिल्ह्यांत करोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचे समाधानकारक चित्र आहे. तर उर्वरीत १४ जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढल्याने थोडीशी चिंता कायम आहे. ( Update )

वाचा:

राज्यात करोनाच्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटल्याचे चित्र आता दिसत आहे. करोनाचा आलेख उतरणीला लागला आहे. राज्यातील कमी होत असून मृत्यूदर ही घटत आहे. मात्र, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या घटल्याने समाधान आहे. राज्यातील ३५ जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या घटली आहे. त्यात पुण्यासह मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सातारा, नाशिक, सोलापूर , नगर, धुळे, औरंगाबाद तसेच चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रुग्ण घटले आहेत. त्या उलट सक्रिय रुग्णांची संख्या वाढलेल्या जिल्ह्यांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, जळगाव, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, , या जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यात ४ जानेवारीला ४८ हजार ८०१ एवढे सक्रिय रुग्ण होते. तर ३ फेब्रुवारीला ३७ हजार ५१६ एवढे रुग्ण असल्याची नोंद करण्यात आली. यावरून एका महिन्यात सक्रिय रुग्णांची संख्या घटल्याची माहिती आरोग्य खात्याच्या अहवालात देण्यात आली आहे.

वाचा:

मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

राज्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक आले होते. विदर्भातील ग्रामीण भागात विशेषत अमरावती, अकोला, यवतमाळ आणि भंडारा या जिल्ह्यांत करोनाचा पॉझिटिव्हीटी दर जास्त आढळून येत असल्याचे निरीक्षण या पथकाने नोंदविले आहे. या अधिकाऱ्यांसोबत मुख्यमंत्री यांनी आज बैठक घेतली. या बैठकीत पथकाने नोंदविलेल्या निरीक्षणाच्या अनुषंगाने नागपूर व अमरावती विभागीय आयुक्तांनी यंत्रणेला अधिक सतर्क ठेवावे, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

वाचा:

करोनाची आजची आकडेवारी

– राज्यात आज १५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. राज्यातील मृत्यूदर सध्या २.५१ % एवढा आहे.
– आज राज्यात २ हजार २१६ नवीन रुग्णांचे निदान झाले.
– ३ हजार ४२३ रुग्ण आज बरे होऊन घरी परतले. आतापर्यंत एकूण १९ लाख ५८ हजार ९७१ रुग्ण करोनामुक्त. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पोहचला ९५.७३ टक्क्यांवर

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here