: करोना प्रतिबंधासाठी आणि कोव्हॅक्सिन अशा दोन अधिकृत लशी मान्यताप्राप्त केंद्रामध्येच दिल्या जात असताना करोना प्रतिबंधासाठी लस देण्यात येईल, असे सांगून काही दलाल एका नव्या कंपनीच्या लशीच्या चाचण्यांसाठी स्वयंसेवक गोळा करत आहे. चाचण्यांमधील माहिती गोपनीय असून एथिक्स कमिटीने दिलेल्या निर्देशांचे पालन केले जात असेल तर कोणत्या कंपनीच्या चाचण्या कुठे व केव्हा होणार आहेत, याची माहिती या मध्यस्थाला कशी आहे, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

वाचा:

स्वयंसेवकांच्या उपलब्धतेसाठी नियुक्त केलेल्या मनीष खंदारे यांनी मुंबईतील सेंट जॉर्जेस आणि उल्हासनगर येथील आशीर्वाद रुग्णालयामध्ये लस दिली जाते, असे सांगितले. चाचण्या आहेत की लस याची कल्पना दिली जाते का, यावर त्यांनी स्पष्ट माहिती दिली नाही. १८ वर्षांवरील कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते, लस घेतल्यानंतर चार वेळा जावे लागणार, पहिल्या, दुसऱ्या व २८व्या व ५६ व्या दिवशी ५०० रुपयांप्रमाणे २००० रुपये देण्यात येणार आहेत. पालिकेशी याचा संबध नाही तसेच १४ दिवस विलग करणार नाही, असेही सांगण्यात आले. लस टोचून घेण्यापूर्वी संमतीपत्र भरावे लागते, आधारकार्डाची प्रत आणावी लागते. सेंट जॉर्जेस रुग्णालयामध्ये स्वयंसेवकांचा पुरवठा करण्याचे काम यापूर्वी केल्याचे त्यांनी सांगितले. ३०जानेवारीला या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत, यापुढील स्वयंसेवक जेजे रुग्णालयातील चाचण्यांसाठी पाठवणार असल्याची माहितीही त्यांनी ‘मटा’ला दिली. यामध्ये सहभागी होण्यासाठी अधिकाधिक व्यक्तींना सोबत घेऊन येता येईल, मात्र त्यांनी करोनाला प्रतिबंध करणारी लस घेतलेली असू नये, असे ते म्हणाले. संबधित रुग्णालयामध्ये गेल्यानंतर कोणत्या व्यक्तीला भेटायचे आहे, त्यांचे नावही तिथे गेल्यानंतर सांगण्यात येणार आहे. कोणत्या कंपनीची लस आहे याची माहिती त्यांनी दिली नाही.

वाचा:

यासंदर्भात सेंट जॉर्जेस रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आकाश खोब्रागडे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी स्फुटनिक चाचण्यांसाठी अशा मध्यस्थांची मदत घेतली नाही तसेच या चाचण्या ३० तारखेला संपल्याचे सांगितले. जेजे रुग्णालायमध्ये पुढील आठवड्यामध्ये झायडस कॅडिलाच्या चाचण्या सुरू होत असल्याच्या माहितीला त्यांनी दुजोरा दिला. उल्हासनगरमधील आशीर्वाद रुग्णालायमध्येही याच कंपनीच्या चाचण्या सुरू आहेत. त्यांची नोंद क्लिनिकल ट्रायल रजिस्ट्रीमध्ये आहे. मात्र जेजे रुग्णालयाची नोंद अद्याप या रजिस्ट्रीमध्ये झालेली नाही.

‘मध्यस्थांचा प्रश्नच नाही’

कोव्हॅक्सिनच्या चाचण्यांसाठी डॉक्टरांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर असा मेसेज पाठवण्यात आला होता. मात्र, त्यात चाचण्यांचा स्पष्ट उल्लेख होता. या चाचण्यांचे सहअन्वेषक डॉ. दिनेश धोडी यांच्याकडे यासंदर्भात विचारणा केली असता त्यांनी अंतर्गत वैद्यकीय संपर्क तसेच आवाहन करून स्वयंसेवकांची उपलब्धता करण्यात आली, त्यात बाहेरील कोणत्याही व्यक्तीची मदत घेण्यात आली नव्हती. उलट चाचण्यांमध्ये दिलेले उदिष् गाठणेही स्वयंसेवकांअभावी अवघड झाले होते, असे सांगितले. उल्हासनगर येथील आशीर्वाद क्लिनिकलचे डॉ. श्रीकांत देशपांडे यांनी अशा कोणत्याही मध्यस्थाची नेमणूक न केल्याचे सांगितले. या चाचण्या सुरू आहेत, त्याला मिळणारा प्रतिसादही समाधानकारक आहे. तसेच जाहिरात करण्याची, पैसे देण्याची संमती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अशा कोणत्याही मध्यस्थांची नेमणूक यासाठी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे त्यांनी ‘मटा’ला सांगितले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here