वाचा:
नगरच्या जिल्हा बँकेच्या निवडणूक प्रक्रिया सध्या सुरू आहे. संचालक मंडळाच्या २१ जागांसाठी ही निवड आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत पुढील आठवड्यापर्यंत आहे. ही निवडणूक सुरू झाली, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते , उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्ष नेते यांनी यामध्ये लक्ष घातले. ही निवडणूक नेहमी ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांमध्येच रंगते. सध्या थोरात यांचे बँकेवर वर्चस्व होते. यावेळी विखे यांनी भाजप आणि आपले मूळ समर्थक यांच्या मदतीने सत्ता काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यामुळे पवार कुटुंबीयांनीही लक्ष घालून महाविकास आघाडीला ताकद देण्याचा प्रयत्न सुरू केली.
वाचा:
आता मात्र, राजकारण बदलत आहे. आज जामखेडमधून राष्ट्रवादीचे भोसले यांनी माघार घेतली. आपण आमदार यांच्या सांगण्यावरून माघार घेत असल्याचे त्यांनी सांगितले. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला असून त्यांच्याच सूचनेवरून आपण माघार घेतली, असे भोसले सांगत आहेत.
भोसले यांच्या माघारीने राळेभात बिनविरोध निवडून येत आहेत. ते म्हणाले की आपण विखे समर्थक आहोत आणि त्यांचेच समर्थक राहणार. मात्र, जामखेड तालुक्यात आमदार पवार यांना साथ देणार. त्यामुळे हे नेमके काय राजकारण सुरू आहे. जामखेडमध्ये विखे आणि पवार यांचे सहमतीचे राजकारण सुरू आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे. तर पाथर्डी तालुक्यातील एका विखे समर्थक उमेदवाराने माघार घेतली. त्यामुळे भाजपच्या राजळे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. २१ पैकी आता चार जागा बिनविरोध झाल्या. त्यातील एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला तर तीन जागी विखे समर्थकांनी बाजी मारली आहे. अर्ज मागे घेण्याची मुदत अद्याप बाकी आहे, त्यामुळे उरलेल्या काळात काय काय होते, निवडणूक झालीच तर अंतिमत: कोण बाजी मारणार याबद्दलची उत्सुकता आता आणखी वाढली आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times