म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मुंबई आणि पालघरच्या चित्रपटगृहांमध्ये बॉम्बस्फोट मालिका घडवून आणण्याची ट्विटरवरून धमकी देणाऱ्या हरयाणाच्या एका तरुणाला मुंबई सायबर पोलिसांनी अटक केली. बनवारीसिंग असे या तरुणाचे नाव असून ‘मॅडम मुख्यमंत्री’ या चित्रपटाचे शो होऊ नयेत, यासाठी बनवारीसिंग याने ही धमकी दिली होती.

वाचा:

बनवारीसिंग याने २२ जानेवारीला एक ट्वीट केले होते. यामध्ये त्याने ‘मॅडम मुख्यमंत्री’ चित्रपटाचे शो असलेल्या मल्टिफ्लेक्समध्ये बॉम्बस्फोट होतील, असे म्हटले होते. हे ट्वीट त्याने मुंबई पोलिस आणि पोलिस आयुक्तांनाही टॅग केले होते. या ट्वीटची गांभीर्याने दखल घेत हा चित्रपट लागलेल्या मुंबई तसेच पालघरमधील सर्व मल्टिफ्लेक्सची पोलिसांनी झाडाझडती घेतली. मात्र, अखेर ही अफवा ठरली. याच दरम्यान हे ट्वीट डिलिट करण्यात आले. मात्र, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून बनवारीसिंग याला येथून शोधून काढले. स्फोटाच्या धमकीचे नेमके कारण मात्र समजू शकले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here