म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

खाकी वर्दीतील पोलिस म्हणजे भावनाशून्य, कठोर असा जनमाणसांत पोलिसांबद्दल समज असतो. परंतु, या गणवेशातील पोलिसांत माणूस दडलेला असतो, त्यालाही मन असते आणि भावनाही. अशाच एका सहायक पोलिस आयुक्ताने मुक्या प्राण्यांच्या वेदना जाणून त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. यांनी प्राण्यांची हिंसा, छळ आणि अत्याचार करणाऱ्यांवर कारवाईसाठी वकिलांची एक टीम तयार केली आहे. इतकेच नाही तर सोशल मीडियावरून विविध संस्थांच्या स्वयंसेवकांची फौज जमवली असून श्वान, मांजर तसेच इतर प्राण्यांच्या मदतीसाठी मदतीसाठी हे धावून जातात.

वाचा:

आपल्या आजूबाजूला अनेक पशु-पक्षी जखमी अवस्थेत पडलेले असतात. प्रामुख्याने रस्त्यावर असलेल्या श्वान आणि मांजर अशा प्राण्यांना तर कुणीच वाली नसते. एखादा प्राणी जखमी अवस्थेत आपल्यासमोर दिसला तरी नेमके काय करावे हे आपल्याला सुचत नाही. वेळेत उपचार न मिळाल्याने या प्राण्याच्या जीवावर बेतते. असे होऊ नये, अशा प्राण्यांना लगेच उपचार मिळावेत तसेच त्यांना कुणीतरी दत्तक घेण्यासाठी पुढे यावे यासाठी एसीपी सुधीर कुडाळकर दिवसरात्र झटत आहेत. कुडाळकर यांनी प्राणिमित्रांचे ८ ते १० व्हॉटसअॅप ग्रुप तयार केले असून या माध्यमातून मुंबई तसेच मुंबईच्या आसपास कुठेही श्वान किंवा इतर प्राण्यांना मदत लागल्यास हे प्राणीमित्र धावून जातात. गेली अनेक वर्षे कुडाळकर हा उपक्रम राबवत असून त्यांना यासाठी प्राणिमित्रांचीही चांगली साथ मिळत आहे.

वाचा:

प्राण्यांवर अत्याचाराच्या घटना देखील दिवसेंदिवस वाढत आहेत. प्राण्याच्या अत्याचारांबाबत त्यांच्या छळाबाबत तक्रार कुठे करायची आणि कशाप्रकारे करायची याबाबत अनेकांना माहिती नसते. यासाठी कुडाळकर यांनी २५ वकिलांची एक टीम तयार केली आहे. या टीममधील वकिलांशी संपर्क केल्यास हे वकील कायदेशीर सल्ला देतात. तसेच कुडाळकर आणि वकिलांची ही टीम कुठे अत्याचार होताना दिसल्यास स्वतः दखल घेतात आणि तक्रार तसेच इतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करतात. कर्तव्य चोख बजावतानाच मुक्या प्राण्यांप्रती कुडाळकर राबवित असलेल्या उपक्रमाबाबत त्यांचे पोलिस दलातून कौतुक होत आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here