नवी दिल्ली : राज्यसभेत आज काँग्रेसचे खासदार यांच्यासहीत चार सदस्यांना निरोप दिला जातोय. या दरम्यान गुलाम नबी आझाद यांचं कौतुक करतानाच भावूक झालेले दिसले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्याच्या घटनांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी आपल्या काही आठवणी सदनात सांगितल्या. ‘त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. गुलाम नबी आझाद यांनी मला त्यादिवशी फोन केला… सर्वात अगोदर मला गुलाम नबी यांचा फोन आला… तो फोन केवळ सूचना देण्यासाठी नव्हता… त्यावेळी त्यांना फोनवरही रडू आवरणं कठीण झालं होतं’, असं सांगताना पंतप्रधान मोदीही भावूक झाले.

गुलाम नबी आझाद यांच्याशी माझा नेहमीच मैत्रीचे संबंध राहिले आहेत. राजकारणात चर्चा, वार-पलटवार सुरूच राहतात पंरतु, एक मित्र म्हणून मी त्यांचा खूप आदर करतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

शरद पवार यांचंही कौतुक
‘गुलाम नबी आझाद यांच्यानंतर जो व्यक्ती हे पद सांभाळणार आहे त्यांना गुलाम नबी यांच्या पावलावर पाऊल ठेवण्यात मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे, याची मला चिंता आहे. कारण गुलाम नबी आझादजी आपल्या पक्षाची काळजी घेत होते. सोबतच देश आणि सदनाचीही ते तेवढीच काळजी घेत होते. ही लहान गोष्ट नाही. अन्यथा विरोधी नेत्याच्या रुपात प्रत्येकाला आपला दबदबा कायम ठेवण्याची इच्छा असते. हा मोह कुणालाही होऊ शकतो… परंतु, ते सदनाला आणि देशाला प्राधान्य देणाऱ्या नेत्यांपैंकी एक आहेत… मी शरद पवार यांनाही या श्रेणीमध्ये ठेवू इच्छितो… ‘ असं म्हणत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचंही कौतुक केलं.

‘पक्षाध्यक्षांच्या बैठकीचा सल्ला आझाद यांच्याकडूनच’

‘करोना काळातही मला गुलाम नबी यांचा फोन आला. त्यांनी मला सर्व पक्षांध्यक्षांची बैठक जरुर आयोजित करा, असा सल्ला दिला. त्यानंतर मी गुलाम नबी आझाद यांच्या सूचनेवरून बैठकीचं आयोजन केलं’ असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलंय.

गुलाम नबी आझाद यांच्यासहीत आज सदनात शमशेर सिंह, मोहम्मद फयाज, नाजिर अहमद यांनाही निरोप देण्यात येतोय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here