वाचा:
कृषी कायद्यांच्या विरोधात राजधानी दिल्लीत गेल्या अडीच महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. आंदोलकांच्या निर्धारापुढं सरकारही हतबल झालेलं दिसत आहे. या पार्श्वभूमीवर काल राज्यसभेत बोलताना पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना चर्चेसाठी आवाहन केलं. त्याचवेळी, त्यांनी आंदोलनजीवी व परजीवी जमातीपासून सावध राहण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला होता. पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या या शब्दप्रयोगावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. मोदींनी शेतकऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला होता. त्यानंतर आज भुजबळ यांनी मोदींच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
वाचा:
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनता दरबार उपक्रमासाठी भुजबळ आज पक्षाच्या प्रदेश कार्यालयात उपस्थित होते. त्याप्रसंगी त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. ‘आंदोलनं ही जगभर होत आहेत. आपल्या देशाला अशी आंदोलनं नवीन नाहीत. भाजप सत्तेत नव्हती त्यावेळी देखील रोज काही ना काही घडत असायचं. कुठे बांगड्या घेऊन जा, कुठे रिकामे हंडे घेऊन जा, कुठे रस्त्यातच बस, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपनं आंदोलनं केली आहेत. सभागृहातही त्यांनी आंदोलनं केली होती, याची आठवणही भुजबळ यांनी करून दिली.
लोकशाहीमध्ये एखादा मुद्दा किंवा सरकारने घेतलेला निर्णय मान्य नसेल तर पत्र पाठवायचं, निषेध व्यक्त करायचा, आंदोलन करायचे असते, त्याला सरकारचा आक्षेप असेल तर आणखी दुसरं काय करायचं,’ असा सवालही छगन भुजबळ यांनी केला.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times