मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. देशातील विविध मुद्द्यांवर भाष्य करणाऱ्यासाठी ती ट्वीट करत असते. कंगनाचे ट्वीट वादग्रस्त असल्यानं तिच्या ट्विटर अकाउंटवर स्थगिती किंवा बंद करण्याचे निर्देश द्यावेत, अशी याचिका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. तसंच, या याचिकेवर लवकरात लवकरात सुनावणी घेण्याची विनंती याचिकादारानं कोर्टाकडे केली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हिच्या ट्विटर अकाउंटवर बंदी घालावी अशी याचिका अॅड अली काशिफ खान देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. तसंच, या याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची विनंती देशमुख यांनी केली आहे. या मागणीवर न्यायालयानं ९ मार्चला सुनावणी ठेवली आहे.

कंगना राणावत आता शेतकरी आंदोलनाविषयी आक्षेपार्ह ट्विट करत असल्याने लवकर सुनावणी घ्यावी, अशी विनंती याचिकादार वकील काशिफ अली खान देशमुख यांनी विनंती केली होती. त्यानंतर याप्रश्नी न्यायालयाने मागील सुनावणीत उपस्थित केलेल्या महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्यांवर स्पष्टीकरण मांडा, असे सांगून ९ मार्चला सुनावणी ठेवली आहे.

वाचाः

सुशांतसिंह राजपूत प्रकरणापासून कंगनानं घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळं ती अनेकदा अडचणीत सापडली आहे. बॉलिवूड व महाराष्ट्र सरकारवर टीका करतानाही तिनं वादग्रस्त वक्तव्येही केली होती. वांद्रे न्यायदंडाधिकारी न्यायालयाने काही कंगनाच्या आक्षेपार्ह ट्वीटबद्दल एफआयआर नोंदवण्याचे निर्देश दिल्यानंतर वांद्र पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. तसंच, अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयातही कंगनाच्या काही आक्षेपार्ह ट्वीट्सविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यामुळं आता न्यायालय कंगनाच्या ट्विटर अकाउंटवर कारवाईचे आदेश देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचाः

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ट्विटरनं कंगनाचे काही अक्षेपार्ह ट्विट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरने कंगनाचे एक- दोन नाही तर अनेक ट्वीट डिलीट केले आहेत. याबद्दल स्पष्टीकरण देताना ट्विटरने कंगनाच्या ट्वीटमुळे अनेक नियमांचं उल्लंघन झाल्याचं सांगितलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here