मुंबईः देशाचे गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते हे सिंधुदुर्ग दौऱ्याहून माघारी परतताच सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपला शिवसेनेने मोठा धक्का दिला आहे. आमदार यांच्या मतदारसंघात भाजपला शिवसेनेनं जोरदार धक्का दिला आहे. वैभववाडी नगरपंचायतीती भाजपच्या सात नगरसेवकांनी एकाचवेळी राजीनामा दिला असून आत हे नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते नितेश राणे यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत शिवसेनेला जोरदार चिमटा काढला आहे.

‘वैभववाडीचे काही नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर आहेत अशी बातमी मी वाचली आहे. व्हॅलेंटाइन डे काही दिवसांवर आहे आणि शिवसेना आमचं जुनं प्रेम आहे, जुन्या प्रेमाला कधी विसरायचं नसतं, असं सगळेच म्हणतात. वैभववाडीची सध्याची परिस्थिती पाहिली तर शिवसेनेकडे उमेदवारीसाठी मुळ शिवसैनिक सापडणार नाही. शिवसेना पक्ष हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे, बाळासाहेब ठाकरेंवर आमचं नितांत प्रेम आहे, त्यामुळं शिवसेना पक्षाची अशी अवस्था होऊ नये, अशी माझ्यासारख्या बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्या कुटुंबाची भावना आहे. म्हणून हे ७ नगरसेवक व्हॅलेंटाइन डे निमित्त उद्धव ठाकरेंकडे पाठवतोय,’ असा मिश्किल टोला नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

वाचाः
‘मेडिकल कॉलेजसाठी नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता. तेव्हा उद्धव ठाकरेंनी सकारात्मक प्रतिसाद देत मेडिकल कॉलेजच्या फाईलवर सही केली, आम्ही उद्धव ठाकरेंना काही देऊ शकत नाही, दिलं तरी घेणार नाही, फुलांचा गुच्छ दिला तर ते स्विकारणार नाहीत. त्यामुळं हे सात नगरसेवक त्यांना आभार आणि धन्यवाद मानण्यासाठी पाठवत आहे. त्याचा स्विकार करावा,’ असं म्हणत नितेश राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. नितेश राणेंचा हा व्हिडिओ सध्या चर्चेला विषय ठरत आहे.

वाचाः

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here