वाचा:
राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्तानं आज पाटील जळगावात आहेत. इथं पाटील यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं. ‘राष्ट्रवादी परिवार संवाद हा कुटुंबातला संवाद आहे. या संवादाच्या माध्यमातून काही सूचना याव्यात आणि त्यातून पक्षाच्या संघटनेत सुधारणा व्हावी यासाठी हे अपेक्षित आहे,’ असं जयंत पाटील म्हणाले. ‘कार्यकर्त्यांची एक मोठी फळी इथं आहे. नेते व पदाधिकाऱ्यांबद्दल असलेल्या सहानुभूतीचं रूपांतर मतांमध्ये करा,’ असंही पाटील म्हणाले.
खडसेंच्या अनुभवाचा उपयोग होईल!
एकनाथ खडसे यांचंही त्यांनी कौतुक केलं. ‘खडसे साहेबांसारखे अनुभवी नेते आपल्याला मिळाले आहेत. त्यांच्या अनुभवाचा फार उपयोग होईल याबाबत मनात शंका नाही,’ असं पाटील म्हणाले.
ही जागा जिंकणं कठीण नाही – खडसे
‘महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबरचा पक्ष आहे. जिल्ह्यातही तो एक नंबरवर यायला हवा. हे यश खेचून आणायचं आहे. संघटनेचा विस्तार झाल्याशिवाय निवडणुकीत जिंकता येत नाही. माणसं जोडा, शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवा, संपर्क वाढवा. ही जागा निवडून आणणं मोठी गोष्ट नाही,’ असा विश्वास एकनाथ खडसे यांनी यावेळी व्यक्त केला. ‘या तालुक्यातील कार्यकर्ता हा नेत्यावर प्रेम करणारा आहे. मागे जे झालं ते विसरा आणि कामाला लागा, असं सांगतानाच, राजीवदादा तुझ्या पाठिशी आहोत, असं आश्वासनही खडसे यांनी दिलं. यावेळी भाजपमधील डझनभर खडसे समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
वाचा: वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times