पीडित तरुणीने विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. ही तरुणी खडकपाडा येथे राहते. नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत ती मोठ्या हुद्द्यावर कार्यरत आहे. विवाह नोंदणी केल्यानंतर तरुणीशी एका व्यक्तीने संपर्क साधला. ब्रिटनमध्ये डॉक्टर असल्याची बतावणी त्याने केली. लग्नाच्या भूलथापा दिल्या. दोघांमध्ये चॅटिंगच्या माध्यमातून संवाद सुरू झाला. जानेवारीत भारतात येणार असल्याचे त्याने तिला सांगितले. त्याने तिला भारतात येणार असल्याचे सांगितले. २३ जानेवारीला त्याने पुन्हा फोन केला. दिल्ली विमानतळावर आलो आहे. सोने असल्याने सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी पकडले असून, सुटका करून घेण्यासाठी सुरुवातीला त्याने तिच्याकडे ६५ हजार रुपयांची मागणी केली.
तरुणी त्याच्या भूलथापांना बळी पडली. तिने त्याला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर केले. त्यानंतर वेळोवेळी तिच्याकडून त्याने पैसे घेतले. एकूण १६ लाख ४५ हजार रुपये घेऊन तो गायब झाला. मात्र, आपली फसवणूक झाली आहे, असे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने प्रकाश शर्मा नावाच्या व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times