औरंगाबाद: पाकिस्तानातील तुरुंगात १८ वर्षांचा काळ व्यथित करून नुकत्याच २६ जानेवारी रोजी भारतात परतेल्या () यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ६५ वर्षांच्या होत्या. मायदेशी परतल्यानंतर अवघ्या १५ दिवसांतच त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हसीना बेगम यांचा दफनविधी औरंगबादमधील पीरगैब कब्रस्थानात करण्यात आला. त्यांना कोणीही वारस नसल्याने नातेवाईक आणि विभागातील नागरिकांनीच त्यांचा दफनविधी केला.

आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी हसीना बेगम या १८ वर्षांपूर्वी पाकिस्तानात गेल्या होत्या. त्यावेळी त्याचा पासपोर्ट हरवला. या कारणामुळे त्यांना तब्बल १८ वर्षांचा काळ तुरुंगात काढावा लागला. औरंगाबाद पोलिसांनी केलेल्या प्रयत्नांनंतर त्यांची सुटका झाली होती.

हसीना बेगम या औरंगाबादमधील रशिदापुरातील रहिवासी होत्या. त्यांचा विवाह दिलशाद अहमद यांच्याशी झाला होता. दिलशाद हे उत्तर प्रदेशातील सहारनपूरचे रहिवासी होते. त्यांच्या पतीचे नातेवाईक पाकिस्तानात होते. त्यानाच भेटण्यासाठी त्या सन २००४ साली रेल्वेने पाकिस्तानात गेल्या होत्या. त्यांचा पोसपोर्ट लाहोर येथे हरवला. त्यानंतर त्यांना तरुंगात डांबण्यात आले. आपण निर्दोष असल्याचे त्यांनी तेथील कोर्टाला सांगितले होते.

क्लिक करा आणि वाचा-
हसीना बेगम यांचे औरंगबादमधील सिटी चौक पोलिस ठाण्याअंतर्गत घर आहे. ही माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानात पाठवली होती. त्यानंतर पाकिस्तानने त्यांची सुटका केली होती.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here