आलिया भट्टचे एअरपोर्टवरील काही व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात ती भारतात परतलेली दिसत आहे. रणबीरचे काका राजीव कपूर यांचं निधन झाल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी आलिया व्हेकेशन सोडून भारतात परल्याचं म्हटलं जात आहे. आलियासोबत या व्हेकेशन ट्रीपवर आकांक्षा आणि तिची बहीण अनुष्का रंजन कपूर सुद्धा होत्या.
भारतात परतल्यावर आलिया लगेचच राजीव कपूर यांच्या निवास स्थानी पोहोचली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोंवर कमेंट करताना युझर्सनी आलियाला ती खूप जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. आज ९ फेब्रुवारीला हृदयविकाराच्या धक्क्यानं राजीव कपूर यांचं निधन झालं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांचे मोठे भाऊ रणधीर कपूर यांनी राजीव यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र उपचाराआधीच त्यांचं निधन झालं.
आलिया आणि रणबीर मागच्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे आलिया नेहमीच कपूर कुटुंबाच्या कठिण काळात त्यांच्यासोबत उभी असेलेली पाहायला मिळते. मागच्या वर्षी रणबीर कपूरचे वडील ऋषी कपूर यांच्या निधनानंतरही आलिया भट्ट कपूर कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी झाली होती. त्यानंतर आजही त्याच्या काकांच्या निधनानंतर आलिया तिचं व्हेकेशन सोडून कपूर कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी भारतात परतली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times