वाचा:
शरद पवार कधी क्रिकेट खेळले नाहीत तरी क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते, याकडे लक्ष वेधताना सचिन तेंडुलकर अन्य विषयावर बोलला तर बिघडले कुठे?, असा सवाल सदाभाऊ खोत यांनी केला होता. त्यावर हसन मुश्रीफ यांनी टोलेबाजी केली. शरद पवारांनी वडीलकीच्या नात्याने सचिनला सल्ला दिला आहे, असे नमूद करताना सदभाऊ खोत यांना पवार यांच्यावर टीका करताना लाज वाटायला हवी होती. शरद पवार यांचं खेळांवर प्रेम राहिलं आहे. त्यांनी आयपीएल स्पर्धा सुरू केल्यामुळे आज ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरांतील टॅलेंटला संधी मिळत आहे. क्रिकेटपटूंना आता निवृत्तीनंतर मोठं मानधन मिळत आहे. ही योजनाही पवारांमुळेच सुरू झाली होती, असे मुश्रीफ यांनी नमूद केले.
वाचा:
शरद पवार यांनी भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी मोठे योगदान दिले पण खोतांनी काय केले? खोतांनी तर कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला होता. या माध्यमातून अनेक बेरोजगार तरुणांची फसवणूक केली गेली. त्यासाठी त्यांच्या मुलावर गुन्हाही दाखल झालेला आहे. तेव्हा तूर्त इतकंच सांगतो की, कडकनाथ कोंबड्या तुमच्या मागे लागल्या की तुम्हाला कळेल, असा इशाराच मुश्रीफ यांनी खोत यांना दिला.
वाचा:
काय म्हणाले होते सदाभाऊ खोत?
‘त्या कुठल्यातरी रेहानाने ट्वीट करून शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले. त्यानंतर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांनी सरकारच्या समर्थनार्थ ट्वीट करून रेहानाचा समाचार घेतला. त्यावर काही लोकांनी टीकेची झोड उठवली आहे. सचिन तेंडुलकरला ज्या विषयातलं कळतं त्याच विषयावर त्याने बोलावं, असे शरद पवार म्हणाले आहेत. आता सचिनला जर अन्य विषयातलं काही कळत नसेल तर मग पवार साहेबांना क्रिकेटचे ज्ञान कधीपासून आले?’, असा उपरोधिक टोला सदाभाऊ खोत यांनी सातारा येथे बोलताना लगावला होता. शरद पवार क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष कसे झाले? त्यांना क्रिकेटचे ज्ञान कधीपासून आले? त्यांनी कधी बॉलिंग-बॅटिंग केली? पवार आता कुस्तीगीर परिषदेचे देखील अध्यक्ष आहेत. मग त्यांनी किती फडावर जाऊन कुस्त्या खेळल्या?, अशी प्रश्नांची सरबत्तीच खोत यांनी केली होती.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times