पुणे: पुणे- नगर रस्त्यावरील येथे अॅक्सिस बँकेच्या समोर एका सराईत गुन्हेगारावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामध्ये त्या सराईताचा मृत्यू झाला असून याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( Latest Update )

वाचा:

(वय २९, रा. लोणीकंद) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. लोणीकंद भागात सचिन हा गोल्डमॅन म्हणून ओळखला जायचा. त्याच्यावरील हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर खुनाच्या गुन्ह्यासह इतर गुन्हे दाखल आहेत. तो काही दिवसांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास तो लोणीकंद येथील अॅक्सिस बँकेजवळ उभा होता. त्यावेळी अॅक्टिव्हावरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने शिंदेवर गोळी झाडली. एक गोळी शिंदे याच्या मानेजवळ गोळी लागली. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

वाचा:

गोळीबाराच्या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेने तातडीने आरोपींचा शोध सुरू केला आहे. गोळीबार पूर्ववैमनस्यातून करण्यात आला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत पोलीस उपअधीक्षक यांनी सांगितले की, दुचाकीवर आलेल्या एकाने पाठीमागून सचिन शिंदेवर गोळीबार केला. त्याच्या मानेजवळ गोळी लागली असून त्यात त्याचा मृत्यू झाला आहे. हल्लेखोर पळून गेले आहेत. मयत हा रेकॉर्डवरील आरोपी आहे. याप्रकरणी आरोपींचा शोध सुरू आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here