म . टा. प्रतिनिधी,कोल्हापूर

कोल्हापुरात भारतीय जनता पक्षाचे () जिल्हा परिषद सदस्य व विरोधी पक्षनेते (Vijay Bhoje) यांच्याविरोधात शिक्षण विभागातील महिला अधिकाऱ्यांनी विनयभंग (Molestation) केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दरम्यान सदस्य भोजे यांनी त्यांच्या विरोधातील तक्रार ही चुकीचे असून यासंबंधी कोर्टात दाद मागू. शिक्षण विभागातील भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून माझ्याविरोधात फिर्याद दिल्याचे म्हटले आहे. (a complaint of against and opposition leader )

दरम्यान, मंगळवारी जिल्हा परिषदेतील विविध पक्षाचे ३२ हून अधिक सदस्यांनी एकत्र येऊन प्राथमिक शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारावर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलाविण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील यांच्याकडे केली. अध्यक्ष पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांना विशेष सभा बोलाविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी विशेष सभा होत आहे. या सभेदिवशी प्राथमिक शिक्षण विभागाच्या खातेप्रमुखांना सभेला उपस्थित राहणे बंधनकारक करावे अशी मागणी सदस्यांनी केली आहे.

दरम्यान, महिला अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद सदस्याविरोधात केलेल्या विनयभंगागाच्या तक्रारीचे सावट मंगळवारी जिल्हा परिषदेत पडलेले पाहावयास मिळाले. महिला अधिकाऱ्यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात सदस्य भोजे यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. फिर्यादित म्हटले आहे, ‘सदस्य भोजे यांनी २०१९ मध्ये दिवाळी भेट देण्याची मागणी केली होती. त्यावेळी मुलीला सोबत घेऊन पैसे देण्यासाठी भोजे यांच्या घरी गेले. त्यावेळी माझ्याकडे अश्लिल नजरेने बघत ‘मला पैसे नकोत’म्हणत माझा हात धरला. मी घाबरून घरी परतले. रात्री फोन करुन ‘तुम्ही मुलीला का घेऊन आलात, तुम्हाला एकटीला बोलावले होते. मी ऑफिसमध्ये तुमच्याकडे काही काम नसताना सारखा कशासाठी येतो हे समजत नाही का ? ’असे अश्लिल बोलत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले होते. याबाबत मी जिल्हा परिषद अध्यक्षांना झालेला प्रकार सांगितला. तेव्हा त्यांनी माझी समजूत काढून तक्रार देऊ नका असे सांगितले होते.

भोजे यांनी २०१९ पासून आतापर्यंत प्रत्यक्ष व दूरध्वनीवरुन अश्लिल बोलून विनयभंग केला आहे. कुस्ती मॅटच्या खरेदी प्रकरणावरुन त्रास देऊन माझ्याकडे वारंवार अश्लिल हेतूने बघून मानसिक त्रास देत असल्याने गुन्हा दाखल करत आहे.’

क्लिक करा आणि वाचा-

माझ्याविरोधात पोलिसांत दिलेली तक्रार खोटी- विजय भोजे

विरोधी पक्षनेते विजय भोजे यांनी ही तक्रार खोटी असल्याचे म्हटले आहे. माझ्याविरोधात पोलिसांत दिलेली तक्रार खोटी आहे. त्या दिवाळी भेट घेऊन आल्या नव्हत्या, तर पैसे घेऊन आल्या होत्या. त्यामुळे मी त्यांना परत पाठविले होते. मॅट घोटाळयात तत्कालिन सीईओ अमन मित्तल यांनी अडीच लाख रुपयांची जबाबदारी निश्चित केली आहे. या प्रकरणी त्या महिला अधिकाऱ्याची खातेनिहाय चौकशी करण्याची शिफारस केली आहे. म्हणून त्या द्वेषापोटी जाणिवपूर्वक, मॅट घोटाळयासंबंधी आवाज उठवू नये म्हणून माझ्याविरोधात तक्रार दिली, असे भोजे यांचे म्हणणे आहे. लोकप्रतिनिधींचा आवाज कोणी अशा चुकीच्या पद्धतीने बंद करण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही. सभागृहाच्या मर्यादा कोणी ओलांडत असेल तर कोर्टात न्याय मागू. कोर्टावर आमचा विश्वास आहे. कोर्टात बाजू मांडू, असेही ते पुढे म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here