गुरपिंदरसिंग बागी या संशयित आरोपीकडे हत्यारे किंवा आक्षेपार्ह कागदपत्रे आढळली नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. इंटेल्लिजन्स विंग (सीआयडी) कडून अमृतसरच्या स्टेट स्पेशल ऑपरेशन सेलच्या एका उपनिरीक्षकाला डिसेंबर महिन्यात अतिरेकी कारवायांबाबत माहिती मिळाली होती. त्यानुसार चार जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सरबजितसिंग किरट हा यातील प्रमुख आरोपी होता. तर इतर तीन जणांची नावेही प्रथम खबरी म्हणून आली होती. हे चौघे बेल्जियम येथील खलिस्तान जिंदाबाद फोर्सच्या जगदीशसिंग गुलजारसिंग या अतिरेक्याच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले होते. अतिरेकी कारवायांमध्ये तरुणांना सहभागी करून घेणे, शस्त्रांसाठी पैसा उभारणे अशा कामांमध्ये या चौघांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले होते.
क्लिक करा आणि वाचा-
या कारवाईबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या चौघांपैकी गुरपिंदरसिंग हा नांदेडमध्ये राहत असल्याची माहिती पंजाब पोलिसांना मिळाली. त्यानंतर पंजाब पोलिसांचे एक पथक गेल्या आठवड्यात नांदेड येथे दाखल झाले होते. या पथकाने पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी गुरपिंजरकसिंगबाबत माहिती दिली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या बागीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पंजाब पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
क्लिक करा आणि वाचा-क्लिक करा आणि वाचा-
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times