उत्तन: भारतीय जनता पक्षाने () मुंबई महानगरपालिकेसह इतर निवडणुकावर लक्ष केंद्रित केले असून आगामी पालिका निवडणुकांसाठी कोणाशीही युती न करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपने स्वबळाचा नारा दिला असून त्यासाठी () समाज आणि ओबीसी तरुणांना आपल्याकडे आणण्यासाठी नवी रणनिती तयार केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी () यांच्याविषयी आकर्षण असलेल्या १८ ते २५ वयोगटातील तरुणांचे संघटन बांधण्याची रणनीती भाजपने आखली आहे. या नवतरुणांचे हे ‘’ संघटन उभारून राज्यभरात ओबीसी हक्क परिषदा आयोजित करणार आहे.

उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये भाजपच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची मंगळवार व बुधवारी बैठक झाली. या बैठकीत आगामी निवडणुकांची रणनीती व नियोजन करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. या बैठकीत येणाऱ्या महापालिका, नगरपालिका निवडणुकांमध्ये कोणाशीही युती न स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपने स्वबळावर सर्व निवडणुका लढविण्याच्या सूचना पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारकडून जनतेवर अन्याय होत असून त्या विरोधात करावयाच्या आंदोलनांचे नियोजन करण्यात आल्याची माहिती आमदार आशीष शेलार यांनी दिली. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू नीट मांडली नाही. याच कारणामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली, असे शेलार म्हणाले.

राज्याचे काही मंत्री ओबीसी समाज आणि ओबीसींच्या घटनेने मिळालेल्या आरक्षणाला धक्का लावण्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शेलार यांनी केला. याच कारणामुळे राज्यभरात आरक्षणाचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने ओबीसी हक्क परिषदा घेण्यात येतील असेही ते म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा-
शिवसेनेने मुंबई, नवी मुंबई आणि कोकणात भाजपतील अनेकांना पक्षप्रवेश देऊन उमेदवारी देण्यााचा सपाटा लावला आहे. शिवसेनेच्या नेतृत्वाने आत्मविश्वास गमावला असून ते भाजपकडे डोळे लावून बसले आहेत, असे म्हणत कोकणी भाषेत सांगायचे झाले तर, आमच्या ताटातील उष्टे, खरकटे खाऊन पोट भरणे सुरू असल्याचे शेलार म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here