औरंगाबाद: शहरातील तारांगणनगर रेल्वे ट्रॅक परिसरातील एका ५० वर्षीय महिलेची छेड काढत तिच्या मदतीला धावून आलेल्या तरुणाला शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी विवाहित महिलेच्या तक्रारीवरुन दोघा टवाळखोरांविरोधात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. तर त्याचा साथीदार फरार आहे. ( )

असे अटकेतील संशयिताचे नाव असून फरार असलेल्या साथीदाराचे नाव असे आहे. या प्रकरणी विवाहितेने पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, विवाहिता मंगळवारी सायंकाळी गल्लीतील दुकानातून किराणा सामान घेऊन घराकडे परत जात असताना दुकानाच्या बाजूलाच दोन अनोळखी मुलं उभी होती. त्यातील एकाने विवाहितेला अडवले आणि ‘तुम्हाला कपडे घ्यायचे आहेत का’ असे विचारले. त्यावर विवाहितेने नाही, असे सांगितले असता दुसऱ्या संशयिताने जवळ येत विवाहितेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. दरम्यान विवाहितेने गल्लीतील एका ओळखीच्या युवकाला आवाज दिला. सदर मुलाने संशयितांना धमकावले असता, त्यांनी युवकासह विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. दरम्यान आरडाओरड झाल्याने गल्लीतील नागरिकांनी धाव घेतली आणि संशयितांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. दरम्यान नागरिकांची जास्त गर्दी झाल्याने दोघेही संशयित पळून गेले. मदतीला धावलेल्या तरुणाच्या तसेच नागरिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे संशयितांची नावे समजली, त्यानंतर विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरुन दोघा संशयितांविरोधात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रात्री उशिरा इम्रान याला अटक केल्याची माहिती पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक यांनी दिली.

वाचा:

महिलांनी घेतली पोलीस ठाण्यात धाव

तारांगण रेल्वे ट्रॅक परिसरात महिलेसोबत घडलेल्या या प्रकारानंतर या भागातील महिला, ज्येष्ठ नागरिक हे पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी महिलेसोबत घडलेल्या प्रकरणाची माहिती देत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर या महिला परत गेल्या.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here