नवी दिल्ली: एमआयएमचे खासदार यांनी मंगळवारी लोकसभेत चीनचा उल्लेख करत केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला. ज्या ठिकाणी भारताचे २० जवान शहीद झाले तिथे भारतीय सैनिक पीपी ४ आणि पीपी ८ यापुढे गस्त घालू शकत नाहीत, असा दावा ओवैसींनी केला. चीनने अरुणाचल प्रदेशात आज भारताच्या सीमेवर गाव वसवले आहे. हे सरकार चीनशी कठोर भाषेत बोलू शकत नाही. सिक्कीममध्येही चीन घुसखोरी करत आहे. असं काय आहे हे सरकार भितंय. पंतप्रधान चीनचं नाव घेण्यास का घाबरत आहेत. पंतप्रधान मोदी अभिभाषणावर उत्तर देतील त्यावेळी चीनचं नाव घेण्याचं धाडस करतील, असं ओवैसी म्हणाले.

बर्फ वितळल्यावर चीन पुन्हा भारताच्या सैन्यावर हल्ला करेल, असा दावा ओवैसी यांनी केला. मग आपली तयारी काय आहे? असं सवाल त्यांनी केला. मी हे का बोलतोय. कारण मी आंदोलनजीवी आहे, असा टोला त्यांनी लगावला.

देशात आंदोलनं होत राहणार आणि नागरिकत्व सुधारमा कायद्याचे (सीएए) नियम सरकार तयार करेल, त्यानंतर जनता पुन्हा रस्त्यावर उतरेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंदोलनजीवी आणि परजीवी असे शब्द वापरले. पण यात वाईट काय आहे. आंदोलनं तर सुरूच राहतील, असं ते म्हणाले.

‘मी एक आंदोलनजीवी आहे. मी उघडपणे बोलत आहे. सरकार सीएएचे नियम बनवेल. त्यानंतर आम्ही पुन्हा रस्त्यावर येऊ. नवीन कृषी कायद्यांमध्ये ‘काळे’ हे आहे की कृषी हा राज्यांचा विषय आहे आणि हे संघराज्य घटनेच्या विरोधात आहे. सरकारने आपला अहंकार मागे ठेवून हे तिन्ही नवीन कृषी कायदे मागे घेतले पाहिजे, असं असदुद्दीन ओवैसी म्हणाले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here