नवी दिल्लीः केंद्रीय रस्ते वाहतूक राज्यमंत्री आणि माजी लष्करप्रमुख जनरल (नि.) व्ही. के. सिंग ( ) यांना काही दिवसांपूर्वी केलेले वक्तव्य गळ्यात अडकलेला काटा बनले आहे. चीनने प्रत्यक्ष ताबा रेषेवर (LAC) १० वेळा अतिक्रमण ( ) केले आहे तर भारताने एलएसीवर किमान ५० वेळा अतिक्रमण केलं असेल, असं तामिळनाडूच्या मदुराईमध्ये ते रविवारी म्हणाले होते.

कॉंग्रेस नेते आणि खासदार ( ) यांनी यावरून व्ही. के. सिंग यांना टीकेचं लक्ष्य केलं आहे. ‘भाजपचे मंत्री चीनला भारताविरूद्ध केस करण्याची संधी का देत आहेत? त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे. त्यांची हकालपट्टी केली गेली नाही तर हा प्रत्येक जवानाचा अपमान असेल, असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिलंय.

सिंग यांच्या वक्तव्यानंतर चीन आक्रमक

व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्यावरून चीनने भारतावर कुरघोडी करण्याची संधी सोडलेली नाही. भारताने नकळत आपली चूक कबूल केली आहे. यामुळे एलएसीवर चिनी सैन्याची उपस्थिती योग्य आहे. एलएसीवर भारत वारंवार ‘बॉर्डर प्रोटोकॉल’चे उल्लंघन करत आहे. यामुळे सीमेवर दोन्ही देशांमध्ये संघर्षाची परिस्थिती निर्माण होत आहे. या भारताने कराराचे पालन करावे. जेणेकरून सीमेवर शांतता प्रस्थापित होईल, असं चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले. व्ही. के. सिंग यांच्या वक्तव्याच्या संदर्भत देत चीनने भारतावर हा निशाणा साधला आहे.

लडाखमध्ये २०२० पासून तणावाची स्थिती

लडाखमध्ये इथल्या गलवान खोऱ्यात दोन्ही देशांच्या जवानांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. यात भारताचे २० जवान शहीद झाले. तर चीनचे ४० हून अधिक सैनिक मारले गेले. पण हे चीनने अद्याप जाहीर केलेलं नाही. चीनने एलएसीवरील स्थिती एकतर्फी बदलण्याचा प्रयत्ने केला होता. पण भारताने असे प्रयत्न कधीही केले नाही, असं परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here