नवी दिल्लीः अर्थसंकल्पीय अधिवेशनात ( ) राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत ( ) पंतप्रधान मोदींनी ( ) कृषी कायद्यांशी ( farm laws ) संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे दिली होती. यादरम्यान त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आता आज बुधवारी पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी लोकसभेत भाषण करणार आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर ते भाष्य करतील. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधी कॉंग्रेस हल्ल्याचे नेतृत्व करतील. यामुळे सर्वांच्या नजरा सभागृहाकडे लागल्या आहेत.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर विविध पक्षांच्या सदस्यांनी सहभागास परवानगी देण्यासाठी लोकसभा सोमवार आणि मंगळवारी उशिरा सुरू होत आहे.

राहुल गांधींचा PM मोदींवर आरोप

कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या विकासाच्या मॉडेलमुळे सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची (PSU) संख्या कमी होईल आणि यामुळे देशाचे नुकसान होईल, असा आरोप राहुल गांधींनी केला. मोदींच्या विकास धोरणात पीएसयूचे आकडे हे पहिल्या क्रमांकवरून घसरून दहाव्या स्थानावर गेले आहेत. यामुळे देशाचे नुकसान झाले आहे आणि पंतप्रधानांच्या निकटवर्तीयांना याचा फायदा झाला, असा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी प्रत्येक आघाडीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करत आहेत. अर्थसंकल्पासंबंधी असो वा शेतकर्‍यांशी संबंधित प्रश्न, भारत-चीन सीमा तणाव असो, ते सरकारला सतत प्रश्न विचारून धारेवर धरत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here