मुंबई: मुंबईतील या पाच महिन्यांच्या चिमुकलीवरील उपचारासाठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारे सर्व कर माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यासाठी विरोधी पक्षनेते यांनी पंतप्रधान यांचे आभार मानले आहेत. ( Latest News )

वाचा:

तीरा कामत या ५ महिन्यांच्या बालिकेला जीन रिप्लेसमेंट उपचारांची नितांत गरज आहे. तिच्या या उपचारांसाठी लोकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात योगदान दिले आणि यासाठी सुमारे १६ कोटी रुपये गोळा करण्यात आले. पुढील उपचारासाठी ‘झोलजेन्स्मा’ हे औषध अमेरिकेतून आयात करावे लागणार होते. मात्र हे औषध भारतात आणण्यासाठी जीएसटी, कस्टम करांसह सुमारे ६.५ कोटी रुपये आणखी खर्च येणार होता. त्यामुळे तीराच्या पालकांनी त्यातून सूट मागण्यासाठी राज्य सरकार तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाठपुरावा केला. त्यानुसार या औषधावरील या सर्व करांतून सूट मागण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी १ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून त्यासंबंधीची विनंती केली.

वाचा:

पंतप्रधान मोदी यांनी ही तातडीची बाब असल्याचे लक्षात घेऊन तसे लगेचच निर्देश दिले. त्यावर वेगाने कार्यवाही झाली आणि आज या औषधीपुरता सर्व कर माफ करणारा आदेश वित्त विभागाने जारी केला आहे. पंतप्रधानांनी अतिशय संवेदनशीलतेने पुढाकार घेत त्वरेने कार्यवाही केल्यामुळे तीरा कामत हिचे प्राण वाचतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे तसेच या त्वरित कार्यवाहीबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार सुद्धा मानले आहेत. तीरा कामत हिला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा शुभेच्छा सुद्धा फडणवीस यांनी दिल्या आहेत.

वाचा:

दरम्यान, तीरासाठी लागणाऱ्या १६ कोटी रुपयांच्या औषधावर आकारण्यात येणारा सीमा शुल्क राज्य सरकारने आधीच माफ केला आहे. याबाबत आमदार यांनी ट्वीट केले आहे. तीराच्या औषधाविषयी राज्य सरकारने सहकार्याची भूमिका घेतली हे पाहून बरे वाटले, असे नमूद करताना राज्याप्रमाणे आता केंद्रानेही मानवतेच्या भूमिकेतून दुसरे पाऊल उचलावे, अशी आशा रोहित पवार यांनी व्यक्त केली होती. रोहित यांच्या ट्वीटनंतर काही वेळातच केंद्राच्या निर्णयाची माहिती फडणवीस यांनी दिली आहे. हा तीरा व तिच्या पालकांसाठी खूप मोठा आधार ठरला आहे.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here