म. टा. प्रतिनिधी, मुंबई

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अदानी समूहाची २३.५० टक्के हिस्सेदारी निश्चित झाली आहे. विमानतळ खरेदी करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष सुरू झाली असून, त्याअंतर्गत आता ‘जीव्हीके’चा ५०.५० टक्के हिस्सा खरेदी करणेच बाकी आहे.

‘जीव्हीके समूह’ मागील दोन वर्षांपासून आर्थिक संकटात आहे. यामुळेच त्यांच्या ताब्यात असलेले खरेदी करण्याच्या हालचाली अदानी समूहाने २०१९मध्ये चालवल्या होत्या. पण, त्या वेळी जीव्हीकेने प्रयत्नपूर्वक अन्य ठिकाणाहून निधी उभा केला व विमानतळ वाचवले. पण, मागील वर्षी ‘जीव्हीके समूहा’विरुद्ध सीबीआयने चौकशी सुरू केल्यानंतर त्यांनी मुंबई विमानतळ विक्री करण्याचे ठरवले. त्यानुसार ”ने त्यांच्या विमानतळ विभागांतर्गत हे विमानतळ खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यातील पहिला हिस्सा त्यांनी ताब्यात घेतला आहे. (मिआल) या कंपनीत जीव्हीके समूहाची हिस्सेदारी ५०.५० टक्के आहे. तर, बिडवेस्ट कंपनीचा हिस्सा १३.५० टक्के आणि ‘एअरपोर्ट कंपनी ऑफ साउथ आफ्रिका’ यांची भागीदारी दहा टक्के आहे. उर्वरित २६ टक्के हिस्सा भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) माध्यमातून केंद्र सरकारकडे आहे. विमानतळ खरेदी करण्याच्या प्रक्रियेत अदानी एंटरप्राइझेसने यापैकी २३.५० टक्के हिस्सा १,६८५ कोटी रुपयांना पूर्ण खरेदी केला आहे. आता पुढील टप्प्यात फक्त जीव्हीके समूहाचा ५०.५० टक्के हिस्सा खरेदी करणे बाकी आहे. हा हिस्सा खरेदी करण्याआधी ‘जीव्हीके’च्या डोक्यावर असलेले २,५०० कोटी रुपयांचे कर्ज भागभांडवलात परावर्तित करणार आहे. त्यानंतर लवकरच विमानतळाचा महत्त्वाचा हिस्सा अदानी समूहाच्या ताब्यात जाईल.

‘एएआय’ची मंजुरी मिळताच व्यवहार

अदानी समूहाच्या विमानतळ खरेदी करण्याच्या व्यवहाराला ‘एएआय’ने मागील महिन्यातच मंजुरी दिली. ही मंजुरी मिळताच अदानी समूहाने तात्काळ करार पुढे नेला, हे विशेष.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here