अहमदनगर: सासू-सुनांचे नाते आणि त्यांच्या संसारातील भूमिका हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. यावर अधारित अनेक चित्रपट, टीव्ही मालिकाही आहेत. राजकारणातही सासू-सुनांच्या वैराची अनेक उदाहरणे आहेत. असे असले तरी तालुक्यातील मोहा गावच्या ग्रामस्थांनी गावचा कारभार सासू-सुनेच्या जोडीकडे सोपविला आहे. काल झालेल्या निवडणुकीत या गावच्या सरपंचपदी सारीका शिवाजी डोंगरे यांची तर उपसरपंचपदी त्यांची सून स्वाती वामन डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वाचा:

आरक्षणामुळे अनेक गावांत महिलाराज आले आहे. जेथे महिला सरपंच झाल्या, तेथे उपसरपंचपद पुरुषाला देण्यात आले आहे. असे असताना मोहा गावात मात्र दोन्ही पदे महिलांकडे तेही चक्क सासू-सुनेकडे देण्यात आली आहेत. या गावात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे समर्थक शिवाजी डोंगरे व भिमराव कापसे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने नऊ पैकी आठ जागा जिंकून सत्ता मिळविली आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत त्यांच्याच ताब्यात सत्ता होती. मागील अडीच वर्षांपासून सारिका डोंगरे याच सरपंच होत्या. यावेळी सरपंचपद महिलेसाठी आरक्षित झाले. त्या जागेवर पुन्हा सारिका डोंगरे यांची वर्णी लावण्याचे निवडून आलेल्या सदस्यांनी ठरविले. त्याही पुढे जाऊन उपसरपंचपदी त्यांच्या सून स्वाती यांना निवडून देण्याचे ठरले.

वाचा:

निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यावर सरपंच पदासाठी सारीका डोंगरे यांनी तर उपसरपंच पदासाठी स्वाती डोंगरे यांनी अर्ज भरले दुसरा एकही अर्ज न आल्याने या दोघींची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी ए. डी. कुलकर्णी व साहाय्यक जयवंत गदादे यांनी जाहीर केले. निवड जाहीर होताच फटाक्यांच्या व ढोलताशांच्या आतषबाजीने गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

वाचा:

आमदार पवार यांच्या नेतृत्वाखाली गावच्या विकासाचे उपक्रम सुरूच ठेवणार असल्याचे डोंगरे यांनी सांगितले. सासू-सुनेच्या ताब्यात गावाचा कारभार आल्याने आता या गावाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. डोंगरे यांच्या घरात राजकीय वातावरण आहे. शिवाय घरात सासू-सुनेचे संबंधही चांगले आहेत. त्यामुळे आता या दोघी आपल्या घरासोबतच गावचा कारभार कसा चालवितात, याकडे लक्ष लागले आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here