नाशिक: शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरसह काही सेलिब्रिटींनी केलेल्या ट्वीटवरून सध्या वादळ उठलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना सचिनसह सर्वच सेलिब्रिटींना एक सल्ला दिला होता. त्यावरून पवारांवरही टीका झाली. राष्ट्रवादीचे नेते, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांनी या संदर्भात प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.

वाचा:

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज नाशिक जिल्ह्याची आढावा बैठक पार पडली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना भुजबळ यांनी शेतकरी आंदोलन व त्यावरून सुरू असलेल्या वादावर आपलं मत मांडलं. शरद पवारांनी सचिनला दिलेला सल्ला योग्य असल्याचं भुजबळ म्हणाले. ‘शरद पवार हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) अध्यक्ष होते. त्यामुळं यांना सल्ला देण्याचा त्यांना अधिकार आहे,’ असं त्यांनी सांगितलं. ‘मी राजकारणावर बोलणे ठीक आहे. पण क्रिकेटवर बोलण्याचा मलाही अधिकार नाही,’ अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

काय म्हणाले होते शरद पवार?

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबाबत सहानुभूती व्यक्त करणारी अमेरिकी पॉपस्टार रिहाना व पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिला सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांच्यासह बॉलिवूडमधील काही मान्यवरांनी उत्तर दिलं होतं. भारताच्या अंतर्गत प्रश्नात ढवळाढवळ करू नका, असं ट्वीट या सर्वांनी एकच हॅशटॅग वापरून केलं होतं. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली होती. ‘भारतरत्न’ असलेल्या सचिन व लतादीदींनी या वादापासून दूर राहायला हवं होतं अशी भावना अनेकांनी व्यक्त केली होती. त्यावर बोलताना पवार यांनी सर्वच सेलिब्रिटींनी सल्ला दिला होता. ‘आपलं क्षेत्र सोडून इतर क्षेत्राबद्दल बोलताना काळजी घ्यायला हवी,’ असं पवार म्हणाले होते.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here