पुणे: आर्थिक गैरव्यवहारांच्या प्रकरणात राज्यातील राजकारणी व उद्योजकांना एकमागोमाग एक नोटीस बजावणाऱ्या सक्तवसुली संचालनालयालावरच (ED) आता एका नोटिशीचं उत्तर देण्याची वेळ आली आहे. पुण्यातील प्रसिद्ध वकील असीम सरोदे यांनी बजावली आहे. ईडीनं आपले फोटोकॉपीचे (झेरॉक्स) १ हजार ४४० रुपये थकवल्याची त्यांची तक्रार आहे.

वाचा:

दोन महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले माजी मंत्री यांच्या कथित भूखंड घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. यांच्या तक्रारीच्या आधारे ही चौकशी सुरू आहे. त्यासाठी ईडीनं दमानिया यांचे वकील असीम सरोदे यांची मदत घेतली होती. चौकशी प्रक्रियेदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी हजारो कागदपत्रांची माहिती सरोदे यांच्या कार्यालयातून घेतली होती. ही माहिती देताना कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रतींचा खर्च ईडीला द्यावा लागेल, अशी अट त्यांनी घातली होती. ईडीनं त्यास मान्यताही दिली होती. प्रत्यक्षात मात्र अद्यापही तो खर्च सरोदे यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळं सरोदे यांनी नोटीस पाठवून थकीत पैशांची मागणी केली आहे.

वाचा:

सरोदे यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी झेरॉक्सच्या बिलाची प्रत ईडीच्या अधिकृत ई मेलवर पाठवली होती. त्यानंतरही ईडीनं बिलाची रक्कम दिलेली नाही. त्यामुळं नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिशीला ईडी कसा प्रतिसाद देते हे पाहावं लागेल.

वाचा:

सरोदे यांनी याआधीही ईडीच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त केली होती. भोसरी भूखंड घोटाळ्याची कागदपत्रे घेण्यासाठी काही दिवसांपूर्वी एक व्यक्ती सरोदे यांच्या कार्यालयात आला होता. मात्र, तो व्यक्ती अधिकृत ओळख सांगण्यास तयार नव्हता. माध्यमांचे प्रतिनिधी सरोदे यांच्या कार्यालयाबाहेर असल्याचं सांगत तो कागदपत्रे न घेताच निघून गेला होता. ईडीच्या या बेजबाबदार वर्तनावर सरोदे यांनी नाराजी व्यक्त केली होती.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here