मिळालेल्या माहितीनुसार, परिसरात पिशवीमध्ये मृतदेह असल्याचे मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे खळबळ उडाली. या घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे तेथे गर्दी झाली होती. काही नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. राजारामपुरी पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पाहणी केली असता, पिशवीमध्ये महिलेचा अर्धवट देह आढळून आला. महिला वयोवृद्ध असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, महिलेची हत्या करून तिचा अर्धवट देह पिशवीत भरून तलावात फेकला. पोलिसांनी पंचनामा करून देह विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून, महिलेची ओळख पटवण्यात येत आहे. याबाबत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times