पुणे: राज्यात विविध ठिकाणी सरपंच आणि उपसरपंचपदासाठी निवडणूक होत आहे. त्याचवेळी मावळमधील टाकवे गावात ग्रामपंचायत सदस्यांच्या नावाने केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सोमवारी ही घटना घडली आहे.
मावळमधील टाकवे येथील ग्रामपंचायत सदस्यांची नावे लिंबावर लिहून ती खिळ्याने झाडाला ठोकल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अविनाश असवले यांनी वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मावळ येथील टाकवे गावातील विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांच्या नावे लिंबावर लिहून, त्यांना खिळे टोचले. त्यानंतर ते लिंबू एका झाडाला ठोकले. हा जादूटोण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला. या जादूटोण्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. टाकवे येथील सरपंच आणि उपसरपंचपदासाठी निवडणूक होणार होती. त्या पार्श्वभूमीवर हा जादूटोण्याचा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत सदस्यांनी वडगाव मावळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times